युक्रेन राष्ट्राध्यक्षपदाची पोरोशेंको यांना शपथ
By admin | Published: June 8, 2014 12:29 AM2014-06-08T00:29:24+5:302014-06-08T00:29:24+5:30
पेट्रो पोरोशेंको यांनी शनिवारी युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाच्या पूव्रेकडील भागात शांततेसाठी एक योजना जाहीर केली आहे.
Next
कीव : पेट्रो पोरोशेंको यांनी शनिवारी युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देशाच्या पूव्रेकडील भागात शांततेसाठी एक योजना जाहीर केली आहे. गेल्या 25 मे रोजी झालेल्या निवडणुकीत पोरोशेंको यांनी विजय मिळविला होता. पूव्रेकडील जनतेसाठी राजकीय सवलती देण्याचे आश्वासन देत, त्यांनी आपल्याला युद्ध किंवा बदल्याच्या भावनेने काम करावयाचे नसल्याचे स्पष्ट केले.
येथील रशियन राजदूत मिखाईल झुराबोव यांनी पोरोशेंको यांच्या भाषणास ‘हेतू लक्षात ठेवून दिलेली आश्वासने’ असे संबोधले आहे. झुराबोव यांनी या शपथविधी समारंभास उपस्थिती लावली होती. त्यांनी युक्रेनने पूव्रेकडील लष्करी कारवाई थांबविण्याची मागणी केली, तसेच या भागात युद्धबंदी जाहीर करून मानवतावादी साहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे ते म्हणाले.
चॉकलेट किंग म्हणून ओळखले जाणारे 49 वर्षीय पेट्रो पोरोशेंको यांनी अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह डझनभराहून अधिक देशविदेशांतील प्रतिनिधींपुढे राजधानी कीव येथील संसदेत शपथ घेतली.
तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हीक्टर यानुकोविच यांना पदच्युत करण्यात आल्यानंतर देशात अस्थिरतेची स्थिती उद्भवून क्रिमिया हा युक्रेनचा भाग सार्वमताद्वारे रशियात सामील झाला. (वृत्तसंस्था)
यानंतर गेल्या 25 मे रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेट्रो पोरोशेंको यांनी एकहाती विजय मिळविला होता.
4पोरोशेंको यांनी शपथ घेतल्यानंतर युक्रेनच्या पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी योजना जाहीर केली. यानुसार पूर्व भागात लवकरच प्रांतीय निवडणूक घेण्याची आणि प्रांतीय प्रशासनाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची घोषणा केली.