फिलिपाईन्सच्या शांतता दलावर सिरियात हल्ला
By admin | Published: August 31, 2014 01:51 AM2014-08-31T01:51:11+5:302014-08-31T01:51:11+5:30
फिलिपाईन्सच्या शांततारक्षक तुकडीवर सिरियातील गोलन टेकडय़ा भागात बंडखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गामीझ यांनी दिली.
Next
दमास्कस : फिलिपाईन्सच्या शांततारक्षक तुकडीवर सिरियातील गोलन टेकडय़ा भागात बंडखोरांनी हल्ला केला असल्याची माहिती फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री व्हॉल्टेअर गामीझ यांनी दिली. शनिवारी पहाटे हा हल्ला सुरू झाल्याचे सांगताना त्यांनी त्याचा तपशील मात्र दिला नाही.
गेल्या काही दिवसांत सिरियातील बंडखोरांनी फिजीच्या 44 शांततारक्षक सैनिकांना ओलिस ठेवले असून संयुक्त राष्ट्रांच्या 2 चौक्यांचे रक्षण करणा:या फिलिपाईन्सच्या 75 सैनिकांना घेरले आहे.
या बंडखोरांनी इस्नयलच्या ताब्यातील गोलन टेकडय़ात शिरकाव करता येईल असा मार्गही ताब्यात घेतला आहे. सिरियातील अल कायदाशी संलग्न असलेल्या ‘अल नुसरा’ या आघाडीचे हे सदस्य असल्याचे बोलले जाते.
व्हॉल्टेअर गामीझ यांनी वार्ताहरांशी बोलताना आमच्या सैनिकांवर आज पहाटे 68 क्रमांकाच्या चौकीवर बंडखोरांनी हल्ला केल्याचे सांगितले. या चौकीपासून 4 किलोमीटर (2.5 मैल) दूर असलेल्या चौकीवरील (क्रमांक 69) सैनिक मात्र सुरक्षित असल्याचे गामीझ
म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षक दलातील फिजीच्या तुकडीला 27 ऑगस्ट रोजी बंडखोरांनी कुनेईत्र येथे सरकारी सैन्याशी लढताना ओलिस ठेवले आहे.
1967 मध्ये 6 दिवस चाललेल्या युद्धात इस्नयलने दक्षिण-पश्चिम सिरियातील बहुतेक गोलन टेकडय़ा ताब्यात घेतल्या आहेत. सिरियातील बंडखोरांशी लढण्यासाठी फिजी, भारत, नेपाळ, आर्यलड, नेदरलँड आणि फिलिपाईन्सचे हलकी शस्त्रस्त्रे वापरणारे 1,224 लष्करी सैनिक तैनात असल्याचे सूत्रंनी सांगितले. (वृत्तसंस्था)