सिरिया रासायनिक शस्त्रस्त्रमुक्त
By admin | Published: June 24, 2014 02:24 AM2014-06-24T02:24:32+5:302014-06-24T02:24:32+5:30
सिरियातील अत्यंत विनाशी ठरलेल्या रासायनिक शस्त्रस्त्रंचा अखेरचा 1क्क् टनांचा टप्पा सोमवारी आंतरराष्ट्रीय रासायनिक शस्त्रस्त्र प्रतिबंध संस्थेकडे नष्ट करण्यासाठी सोपविण्यात आला.
Next
>द हेग/जेरूसलेम : सिरियातील अत्यंत विनाशी ठरलेल्या रासायनिक शस्त्रस्त्रंचा अखेरचा 1क्क् टनांचा टप्पा सोमवारी आंतरराष्ट्रीय रासायनिक शस्त्रस्त्र प्रतिबंध संस्थेकडे नष्ट करण्यासाठी सोपविण्यात आला. सिरिया रासायनिक शस्त्रस्त्रमुक्त झाल्याची घोषणा संस्थेने केली आहे. ही रासायनिक शस्त्रस्त्रे सिरियाकडे असणा:या एकूण शस्त्रस्त्रपैकी 8 टक्के होती. रासायनिक शस्त्रस्त्र बंदी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सिरियाकडे एकूण 13क्क् टन रासायनिक शस्त्रस्त्रे होती. ही शस्त्रस्त्रे अवघड ठिकाणी असून, हा साठा बंडखोरांच्या हाती लागणो अशक्य आहे, असा दावा सिरियन अध्यक्ष बशर अल असाद हे करत असत.
सिरियातील सुरक्षेची स्थिती आता सुधारली असून, रासायनिक शस्त्रस्त्रंचा अखेरचा टप्पा ट्रकने लटाकिया बंदराकडे पाठविण्यात आला, तेथून तो जहाजात चढविण्यात आला, असे सूत्रंनी सांगितले.
लटाकियात पाठविलेली ही शस्त्रस्त्रे अमेरिकेच्या केप रे या मालवाहू जहाजावर चढविली जातील. शस्त्रस्त्रे नष्ट करण्यासाठी काही आठवडे लागतील. त्यामुळे रासायनिक शस्त्रस्त्रे पूर्णपणो नष्ट करण्यासाठी देण्यात आलेली 3क् जून ही तारीख अखेर हुकणार आहे.
सिरियातील बहुतांश रासायनिक शस्त्रस्त्रे लटाकिया बंदरातून बाहेर पडली आहेत. 1क् देशांच्या सहभागातून रासायनिक शस्त्रस्त्रे नष्ट करण्याची ही योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी लाखो डॉलर खर्च झाले आहेत.
सिरियाने गेल्या सप्टेंबर महिन्यात रासायनिक शस्त्रस्त्रे पूर्णपणो नष्ट करण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी अमेरिका व रशिया यांच्याशी करार केला होता. दमास्कस या राजधानीच्या शहराबाहेर सरीन या विषारी वायूच्या हल्ल्यात शेकडो नागरिक व लहान मुले मरण पावल्यानंतर हा करार करण्यात आला. या करारामुळे अमेरिकेचा सिरियावरील हल्ला टळला होता.
सिरियाकडे असणारा रासायनिक शस्त्रस्त्रंचा हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा साठा म्हणून ओळखला जात होता. त्याचा उपयोग विनाशासाठी करण्यात आला, पाश्चात्य देश याचा ठपका असादच्या राजवटीवर ठेवतात तर असाद यासाठी बंडखोर जबाबदार असल्याचा दावा करतो. सिरियाने ही शस्त्रस्त्रे व त्यांची निर्मिती करणारे कारखाने नष्ट करण्याच्या अनेक अंतिम तारखा आजर्पयत मोडल्या आहेत. गेल्या आठवडय़ार्पयत सिरियात असे कारखाने होते. त्यात मस्टर्ड, सरीन, व अनेक विषारी वायू यात तयार होत होते. केप रे वरील विशेष उपकरणाने हे वायू नष्ट केले जातील. या प्रक्रियेला काही आठवडे वा महिनेही लागतील. ही शस्त्रस्त्रे सिरियातून बाहेर गेली की संयुक्त राष्ट्राच्या पथकाने सिरियात येऊन पाहणी करावी व सिरिया विषारी शस्त्रस्त्रमुक्त झाल्याची घोषणा करावी, असे असाद सरकारचे म्हणणो आहे.
इस्नयलचा हवाई हल्ला
इस्नयलने रविवारी रात्रभर सिरियाई सैन्य तळांवर हवाई हल्ले चढविले. यात 1क् सैनिक जखमी झाले. ही कारवाई सिरियाकडून झालेल्या हल्ल्यात एक इस्नयली मुलगा मारला गेल्यानंतर हाती घेण्यात आल्याचा दावा इस्नयली सैन्य प्रवक्त्याने केला. सिरियाने याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही. इस्नयलने सिरियन सैन्याच्या 9 तळांवर हल्ले केल्याचा दावा प्रवक्त्याने केला. या हल्ल्यात सिरियाच्या एका ब्रिगेडचे मुख्यालय नष्ट झाले. (वृत्तसंस्था)
21 ऑगस्ट 2क्13 : राजधानी दमास्कनजीकच्या घोटू प्रांतात रासायनिक हल्ला
14 सप्टेंबर : अमेरिका आणि रशिया यांच्यात सिरियातील रासायनिक शस्त्रस्त्रे नष्ट करण्यावर सहमती
31 डिसेंबर : शस्त्रस्त्रे नष्ट करण्याची प्राथमिक मुदत संपली
4 फेब्रुवारी 2क्14 : दुसरी मुदतही संपली
27 एप्रिल : नवीन मुदतवाढ
3क् जून : संपूर्ण शस्त्रसाठा नष्ट करण्याची मुदत