4 वर्षानंतर अलेप्पो शहरावर सीरियाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 07:00 AM2016-12-23T07:00:01+5:302016-12-23T08:09:27+5:30

सीरिया सैन्याने चार वर्षानंतर अलेप्पो शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Syrian occupation of Aleppo city after 4 years | 4 वर्षानंतर अलेप्पो शहरावर सीरियाचा ताबा

4 वर्षानंतर अलेप्पो शहरावर सीरियाचा ताबा

Next
ऑनलाइन लोकमत
अलेप्पो, दि. 23 - सीरिया सैन्याने चार वर्षानंतर अलेप्पो शहरावर पूर्णपणे  नियंत्रण मिळविले आहे. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.  भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 च्या सुमारास जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.
 
(सीरियाच्या तरुणाकडे पुण्याचे सीमकार्ड)
 
ज्यांनी दहशतवादाविरोधात आपलं योगदान दिलं त्या सर्वांचा  हा विजय आहे, असं सीरियाचे  राष्ट्रपती  बाशर-अल-असद म्हणाले. त्यांनी चीन आणि रशियाचा विशेष उल्लेख केला.  यासोबत  अलेप्पो, होम्स, हमा, दमिश्क आणि लताकिया  या पाच शहरांवर सीरिया सरकारने पूर्णपणे ताबा मिळवला आहे.
 
(IS च्या मदतीनं तुरुंग फोडून सीरियाला पळण्याचा यासिन भटकळचा प्लॅन)
 
राष्ट्रपती  बाशर-अल-असद आणि त्यांच्या सहकार्यांसाठी हा मोठा विजय आहे. दरम्यान, रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या मदतीने अध्यक्ष बाशर-अल-असद यांनी हा विजय मिळविला असं मानलं जात आहे.
 

 

Web Title: Syrian occupation of Aleppo city after 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.