तहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या फजुल्लाह ड्रोन हल्ल्यात झाला ठार?
By admin | Published: January 26, 2016 08:47 AM2016-01-26T08:47:25+5:302016-01-26T08:48:10+5:30
'तहरिक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजुल्लाह ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २६ - गेल्या वर्षी पेशावरमधील लष्करी शाळा आणि मागच्याच आठवड्यात बाचा खान युनिव्हर्सिटीवर झालेल्या दहशतवादी जबाबदारी स्वीकारणा-या 'तहरिक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजुल्लाहचा ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.
या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फजुल्लाहच्या अफगाणिस्तानातील घरावर पाकिस्तानी लष्कर व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात फजुल्लाह, त्याची पत्नी, मुलगा यांच्यासह एकूण ५ जण ठार झाले आहेत.
दरम्यान यापूर्वीही अनेकवेळा फजुल्लाहच्या मृत्यूच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र तहरिक-ए-तालिबानने त्या सर्व वृत्तांचे खंडन करत फजुल्लाह जिवंत असल्याचा दावा केला होता.
Pakistan media reports TTP leader Mullah Fazlulah killed in a drone attack in Afghanistan
— ANI (@ANI_news) January 25, 2016