ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! भारताच्या NSG सदस्यत्त्वाला पुन्हा खोडा
By admin | Published: June 5, 2017 05:35 PM2017-06-05T17:35:35+5:302017-06-05T17:35:35+5:30
भारताच्या एनएसजी (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 5 - भारताच्या एनएसजी (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. बदलेल्या परिस्थितीनुसार भारताला सदस्यत्त्व मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे असंही चीननं म्हटले आहे. 48 सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीनचे सुरुवातीपासूनचे मत आहे. एनएसजीचं सदस्यत्व जसं भारताला हवं आहे तसंच ते पाकिस्तानलाही हवं आहे. भारताला सवलती देऊन प्रवेश देणार असाल तर, तोच नियम पाकिस्तानलाही लावा अशी चीनची भूमिका आहे. चीनचे मन वळवण्यासाठी भारत कुटनितीक स्तरावर मोठया प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
काही अटी मान्य नसल्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय आण्विक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. आशातच आता भारताच्या एनएसजीच्या सहभागातल्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत असं वक्तव्य चीनचे परराष्ट्र मंत्री ली हुईलाई यांनी केले आहे. तर अण्वस्त्रप्रसार बंदी करारांवर एनपीटी स्वाक्षऱ्या न केलेल्या देशांचाही एक गट आहे. ज्यामध्ये भारतही आहे. त्यामुळे भारताचे सदस्य जास्त असूनही भारताला या संघात सहभागी होण्याच्या अडचणी येणार आहेत.
पाकिस्तानच्या सदस्यत्वाबाबत चीननं उघडपणे पाठिंबा दर्शवलेला नाही. असं असलं तरीही एनएसजी आणि एनपीटी असे दोन वर्ग तयार करून चर्चा व्हावी अशी मागणी चीननं केली आहे. चीननं यासाठी सहा सदस्यीय समितीही तयार केली आहे. ही समिती भारत आणि पाकिस्तानच्या सदस्यत्त्वासंदर्भातला निर्णय घेईल, असंही ली यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र या संघटनेच्या नियमांनुसार नव सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे