तैवानचा आरोप, चीनच्या दबावामुळेच कोरोनासंदर्भात आम्ही दिलेल्या सूचना WHO जाहीर करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:28 AM2020-03-31T00:28:28+5:302020-03-31T00:34:47+5:30

तैपेई - तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने जागतीक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ त्यांच्या ...

taiwan accused who is not sharing our coronavirus information under pressure of china sna | तैवानचा आरोप, चीनच्या दबावामुळेच कोरोनासंदर्भात आम्ही दिलेल्या सूचना WHO जाहीर करत नाही

तैवानचा आरोप, चीनच्या दबावामुळेच कोरोनासंदर्भात आम्ही दिलेल्या सूचना WHO जाहीर करत नाही

Next
ठळक मुद्देतैवानने विचारलेल्या प्रश्नांनकडे दुर्लक्ष करत आहे डब्ल्यूएचओ तैवानवे कोरोनावर नियंत्रण मिळवले आहेचीन सातत्याने तैवान हा आपलाच भाग असल्याचे सांगत असतो

तैपेई - तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने जागतीक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ त्यांच्या देशातील कोरोना बाधित आणि त्यांच्यावरील उपचाराच्या पद्धती आपल्या सदस्य राष्ट्रांना सांगणे टाळत आहे. चीनच्या दबावामुळे डब्ल्यूएचओने तैवानला सदस्यत्व दिलेले नाही. चीन सातत्याने तैवान हा आपलाच भाग असल्याचे सांगत असतो. यामुळे तैवान संतप्त आहे.

तैवानने विचारलेल्या प्रश्नांना दुर्लक्षित करते डब्ल्यूएचओ
तैवानने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसच्या प्रकोपाच्या काळात तैवानला डब्ल्यूएचओमधून बाहेर करून तैवानी जनतेच्या जीवाशी खेळले जात आहे. सुदैवाने तैवानने कोरोनाचे संकट फार पूर्वीच ओळखले आणि तत्काळ उपाययोजना करून कोरोनाला रोखण्यात त्यांना मोठे यश आले. यासाठी तैवानची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

डब्ल्यूएचओ, हा आजार (कोरोना) सुरू होण्यासंदर्भात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उपेक्षा करत आहे, असा आरोप तैवानने गेल्या आठवड्यात केलाह होता.

डब्ल्यूएचओने रविवारी तैवानसंदर्भात एक पत्रक काढले. ते कोरोना व्हायरसच्या प्रसारावर लक्ष ठेऊन आहेत. तैवानमधील नागरीक या संकटावर कशाप्रकारे मात करत आहेत, हेही पाहत आहोत. तसेच आम्ही तैवानच्या तज्ज्ञांनी चर्चा करत आहोत, असा दावाही यात करण्यात आला होता. 

याला उत्तर देत, तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जोआना आऊ यांनी म्हटले आहे, की डब्ल्यूएचओला तैवानवर जे प्रतिबंध लावण्यात आले आहेत त्यावर विचार करायला हवा. तैवानने दिलेल्या सूचना डब्ल्यूएचओने कुणालाही सांगितल्या नाही. ते म्हणाले, आमच्या देशात जेव्हापासून कोरोनाचा प्रासार व्हायला सुरुवात झाली, तेव्हापासून आम्ही प्रत्येक प्रकरण आणि प्रतिबंध यासंदर्भात डब्ल्यूएचओला माहिती दिली. मात्र त्यांनी त्यांच्या जाहीर होणाऱ्या दैनंदिन अहवालात. याचा कधीच उल्लेख केला नही. यामुळेच विविध देशांतील आरोग्य संघटनांना तैवानमधील सध्य स्थितीची कल्पना नाही. आम्ही या आजारावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवले हे या देशांना समजत नाही. आमच्या सीमा बंद आहेत, की नाही. असे असताना तैवानसह आम्ही संपूर्णण क्षेत्राची माहिती घेत आहोत, हा डब्ल्यूएचओचा दावा चुकीचा आहे. आमचे आकडे डब्ल्यूएचओ चीनच्या आकड्यांशी जोडले आहेत. यामुळे इतर देश भ्रमित होत आहेत. त्यांना असे वाटत आहे, की तैनावची स्थितीही चीन सारखीच आहे, असे आऊ यांनी म्हटले आहे.

Web Title: taiwan accused who is not sharing our coronavirus information under pressure of china sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.