Taiwan Govt Tour Package : पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवान सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांना देणार रोख रक्कम! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 03:30 PM2023-02-26T15:30:41+5:302023-02-26T15:31:45+5:30

Taiwan Govt Tour Package : तैवान सरकार 82 मिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या पॅकेजद्वारे प्रत्येक पर्यटकाला 165 डॉलरचे प्रोत्साहन देत आहे.

taiwan govt tour package taiwan governments big announcement to increase tourism post pandemic | Taiwan Govt Tour Package : पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवान सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांना देणार रोख रक्कम! 

Taiwan Govt Tour Package : पर्यटनाला चालना देण्यासाठी तैवान सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांना देणार रोख रक्कम! 

googlenewsNext

कोरोना महामारीने जगभरातील लोकांचे जनजीवन तर विस्कळीत केले आहे. याशिवाय कोरोनाचा जगावर आर्थिकदृष्ट्याही विपरित परिणाम झाला आहे. विशेषतः पर्यटन क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कारण या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास अतिशय भयानक आणि धोकादायक टप्प्यावर आला होता. पण, आता कोरोनासंबंधी सर्व निर्बंध  हळूहळू हटवण्यात आल्याने पर्यटन क्षेत्रानेही रिकव्हरीच्या दिशेने भरारी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, हा आकडा अद्याप कोरोनापूर्वीच्या स्तरापर्यंत पोहोचलेला नाही. दरम्यान, अशा परिस्थितीत जर तुम्हाला तैवानला भेट द्यायची असेल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे, कारण हा देश आता पाच लाख पर्यटकांना रोख रक्कम देऊन प्रोत्साहन आणि सवलत देत आहे.

माहितीनुसार, तैवान सरकार 82 मिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या पॅकेजद्वारे प्रत्येक पर्यटकाला 165 डॉलरचे प्रोत्साहन देत आहे. सवलत, लकी ड्रॉ आणि एअरलाइन्सद्वारे प्रवाशांमध्ये भत्ते वितरित केले जातील. पर्यटकांना विविध खरेदीवर इलेक्ट्रॉनिक किंवा भत्त्यांच्या स्वरूपात रोख हँडआउट्स देखील प्रदान केले जातील. ठराविक संख्येने पर्यटक आणण्यासाठी देशातील ट्रॅव्हल एजन्सींनाही पैसे दिले जातील. 

दरम्यान, तैवानच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा जवळपास 4 टक्के आहे. कोरोना महामारीनंतर देशातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे देशाच्या निर्यातीत झालेली घट पूर्ण करणे, हे देखील या उपायांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी तैवानने परदेशी पर्यटकांना आपल्या देशात फिरण्याची परवानगी दिली. यानंतर देशात आलेल्या पर्यटकांची संख्या जवळपास नऊ लाखांहून अधिक होती. परंतु चीनबरोबरच्या भू-राजकीय तणावामुळे तैवानला हाँगकाँग आणि मकाऊ येथील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. 

Web Title: taiwan govt tour package taiwan governments big announcement to increase tourism post pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.