चीनच्या लढाऊ विमानांना पळवून लावलं; तैवानच्या हद्दीत केली होती घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:02 PM2020-06-16T21:02:17+5:302020-06-16T21:05:48+5:30

वानमध्ये चिनी विमानांनी आठवड्यातून तीन वेळा घुसखोरी केली, पण त्यांना प्रत्येक वेळी तैवाननं चोख प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं आहे.

taiwan jets drive away intruding chinese fighter plane | चीनच्या लढाऊ विमानांना पळवून लावलं; तैवानच्या हद्दीत केली होती घुसखोरी

चीनच्या लढाऊ विमानांना पळवून लावलं; तैवानच्या हद्दीत केली होती घुसखोरी

Next

तैपेईः गेल्या काही दिवसांपासून चीन शेजारील राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरत चालला आहे. इकडे भारत तर तिकडे तैनावला नियंत्रण रेषेत चीनची घुसखोरी सुरूच आहे. चीन तैवानला वन चायना पॉलिसीचा भाग समजतो, पण तैवान हे स्वतंत्र राष्ट्र असल्यानं त्यांनीही चीनचा दावा कधीही स्वीकारलेला नाही. त्यामुळे चीन नेहमीच त्यांना धमकावत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच चीनने तैवानला धमकी दिली होती. त्यानंतर तैवानमध्ये चिनी विमानांनी आठवड्यातून तीन वेळा घुसखोरी केली, पण त्यांना प्रत्येक वेळी तैवाननं चोख प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं आहे.
 
अनेक वर्षांपासून चीन तैवानला आपलाच एक भाग मानतो. पण तैवानचे स्वतःचे निवडलेले लोकशाही सरकार आहे. चीनच्या विरोधामुळे तैवानला अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी चिनी सैन्याच्या विमानांनी असाच तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आणि त्यांचे जे-10 विमान तैवानच्या हवाई हद्दीत घुसले. त्यावेळी तैवानच्या विमानांनीही उड्डाण घेत चिनी सैन्याचे विमानांना पळवून लावले.
तत्पूर्वी याच तैवानच्या हवाई क्षेत्रामध्ये मंगळवारी चीनच्या एसयू -30 विमानांनी प्रवेश केला होता. तेव्हाही त्यांना इशारा देण्यात आला होता. ही विमाने चीनमधील अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित विमाने होती. त्यानंतर शुक्रवारीदेखील चिनी वाय-8, प्रोपेलर विमान तैवानच्या हवाई हद्दीत दाखल झाले, ज्यास तैवानने इशारा दिल्यानंतर ते माघारी फिरले.

चीनने गेल्या महिन्यात धमकी दिली होती की, जर तैवान वन चायना पॉलिसी स्वीकारण्यास तयार नसेल तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल. चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य आणि संयुक्त कर्मचारी विभागाचे प्रमुख ली झुओचेंग यांनी म्हटले आहे की, तैवानला मुक्त होण्यापासून रोखण्यासाठी इतर कोणताही मार्ग न मिळाल्यास चीन त्यावर हल्ला करेल.

हेही वाचा

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

Web Title: taiwan jets drive away intruding chinese fighter plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन