तैवानमध्ये विमान नदीत कोसळले; २६ ठार, १७ बेपत्ता

By Admin | Published: February 5, 2015 02:53 AM2015-02-05T02:53:48+5:302015-02-05T02:53:48+5:30

तैवानची राजधानी तैपेई येथून ५८ प्रवाशांसह उड्डाण घेतलेले विमान हवेतच कलंडून नदीमध्ये कोसळले. तत्पूर्वी, त्याचा एक पंख रस्त्यावरील टॅक्सीवर धडकला होता.

Taiwan plane crashes into river 26 killed, 17 missing | तैवानमध्ये विमान नदीत कोसळले; २६ ठार, १७ बेपत्ता

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले; २६ ठार, १७ बेपत्ता

googlenewsNext

तैपेई : तैवानची राजधानी तैपेई येथून ५८ प्रवाशांसह उड्डाण घेतलेले विमान हवेतच कलंडून नदीमध्ये कोसळले. तत्पूर्वी, त्याचा एक पंख रस्त्यावरील टॅक्सीवर धडकला होता. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत २६ प्रवासी ठार झाले, तर १७ अद्यापही बेपत्ता आहेत. उड्डाणानंतर काही क्षणांतच ही दुर्घटना घडली.
ट्रान्सएशिया एअरेवजच्या फ्लाईट क्रमांक जीई-२३५ या विमानातील निम्म्याहून अधिक प्रवासी चिनी आहेत. २४ जण बेपत्ता असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकांनी विमानाच्या फ्युजलेज भागात शिरून जखमी प्रवाशांची सुटका केली. हे विमान किलुंग नदीमध्ये कोसळले.
गेल्या वर्षभरात दुर्घटनाग्रस्त होणारे ट्रान्सएशिया एअरेवज या कंपनीचे फ्रेंच-इटालियन बनावटीचे हे दुसरे विमान आहे. किनमेन बेटावर जाण्यासाठी या विमानाने सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी तैपेईच्या सुंगशान विमानतळावरून उड्डाण घेतले होते. उड्डाणानंतर काही क्षणांतच वैमानिकाने दुर्घटनेच्या शक्यतेचे संकेत दिले होते, असे तैवानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने सांगितले. उड्डाणानंतर चार मिनिटांत विमानाचा संपर्क खंडित झाला होता, असे ट्रान्सएशियाचे संचालक पीटर चेन यांनी सांगितले. उड्डाणासाठी हवामान योग्य होते. दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही. दुर्घटनाग्रस्त झालेले विमान नवीन असून त्याला एक वर्षही झालेले नाही, असेही ते म्हणाले. दुर्घटनाग्रस्त विमानातील ३१ प्रवासी चीनचे आहेत, असे तैवानच्या पर्यटन विभागाने सांगितले. तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने १९ प्रवासी ठार, १५ जखमी, तर २४ बेपत्ता असल्याचे सांगितले.
बेपत्ता प्रवासी एक तर विमानाच्या फ्युजलेज भागात असतील किंवा नदीत वाहून गेले असतील, असे तैपेईच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी वु जून-होंग यांनी सांगितले. या क्षणी फारसे आशावादी चित्र नाही. विमानाच्या समोरील भागात असलेल्या प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याचे दिसते, असे वू यांनी सांगितले. ते घटनास्थळी पत्रकारांशी बोलत होते. विमानाच्या एका पंखाचा फ्रीवेवरील टॅक्सीला तडाखा बसला. यात टॅक्सीचालक व एक प्रवासी जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

च्दुर्घटनेच्या वेळी तैवानच्या राष्ट्रीय फ्रीवे क्रमांक एकवरून जाणाऱ्या कारचालकांनी मोबाईलद्वारे याचे चित्रण केले होते. या चित्रफिती आॅनलाईन पोस्ट करण्यात आल्या असून काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचे प्रसारण केले. या चित्रफिती अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत.
च्एका चित्रफितीत हे विमान हवेतच एका बाजूला कलंडल्याचे दिसते. दुसऱ्या चित्रफितीत कलंडलेल्या अवस्थेतील विमानाचे एक पंख रस्त्यावर घासत एका वाहनावर आदळताना दिसते.

 

Web Title: Taiwan plane crashes into river 26 killed, 17 missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.