तैवानला १.८३ अब्ज डॉलरचा शस्त्रपुरवठा
By Admin | Published: December 18, 2015 01:57 AM2015-12-18T01:57:33+5:302015-12-18T01:57:33+5:30
अमेरिकेने तैवानला १.८३ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची घोषणा केल्याबद्दल चीनने गुरुवारी अमेरिकेच्या येथील राजदूताला बोलावून तीव्र निषेध नोंदवला.
बीजिंग : अमेरिकेने तैवानला १.८३ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र पुरवठा करण्याची घोषणा केल्याबद्दल चीनने गुरुवारी अमेरिकेच्या येथील राजदूताला बोलावून तीव्र निषेध नोंदवला. या व्यवसायात गुंतलेल्या अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा इशाराही चीनने दिला आहे. तैवान व चीन हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.
उप परराष्ट्रमंत्री झेंग झेंगुअंग यांनी बुधवारी चीनमधील अमेरिकन दूतावासातील प्रभारी काये ली यांना बोलावून घेऊन निषेध नोंदवला. तैवानला आपली संरक्षण सिद्धता वाढविण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने १.८३ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे विकण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्धीस दिले.
या शस्त्रास्त्रांमध्ये दोन युद्धनौका, रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रे, टीओडब्ल्यूटूबी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, एएव्ही -सेव्हन अॅम्फिबियोस अॅसॉल्ट व्हेईकल्स आणि इतर अनेक प्रकारच्या अवजड लष्करी उपकरणांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)