तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:35 AM2018-10-22T10:35:31+5:302018-10-22T10:52:53+5:30

तैवानमध्ये रविवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण जखमी झाले आहेत.

Taiwan Train Accident Kills at Least 18 and Injures About 170 Others | तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी

तैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी

Next

तैपेई - तैवानमध्ये रविवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तैपेईतील तायतूंग येथे जाणाऱ्या पुयूमा एक्स्प्रेसचे आठ डबे रविवारी रुळावरुन घसरले. जवळपास 300 हून अधिक प्रवासी या ट्रेनने प्रवास करत होते. अपघातात अनेक जण जखमी झाले असून डब्याखाली अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच रुळावरुन  डबे हटवण्याचे काम सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. 

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घटनास्थळी मदतकार्यासाठी 120 जवानांना पाठवले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी सुरु आहे, असे तैवानमधील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. 

Web Title: Taiwan Train Accident Kills at Least 18 and Injures About 170 Others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.