Taiwan Train Derails : Video - मोठी दुर्घटना! तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, 36 प्रवाशांचा मृत्यू तर 72 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 11:14 AM2021-04-02T11:14:49+5:302021-04-02T11:43:07+5:30
Taiwan Train Derails : रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत.
पूर्व तैवानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.
तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेल्वे रूळावरून एक ट्रेन घसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ट्रेनमधून जवळपास 350 प्रवासी प्रवास करत होते.
At least 36 people have died after a train derailed on Friday in eastern Taiwan, while 72 were injured, the transport ministry said: Reuters
— ANI (@ANI) April 2, 2021
Breaking: Fire department says several feared dead and injured after a train carrying around 350 passengers derailed in a tunnel in Hualien County, Taiwan. (Video via 鄭榮貴 on Facebook) pic.twitter.com/WTyMeoXJQ1
— PM Breaking News (@PMBreakingNews) April 2, 2021
Egypt Train Accident : इजिप्तमध्ये भीषण अपघात! दोन ट्रेनची जोरदार धडक; 32 जणांचा मृत्यू, 66 जण जखमी
इजिप्तमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन ट्रेनची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 32 जणांच्या मृत्यू झाला असून 66 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिस्त्रच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्र शहरातील सोहागच्या उत्तरेला दोन ट्रेनची धडक झाली. यामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सोहाग प्रांतातील ताहाटा जिल्ह्यात रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले जात आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
🚨#BREAKING| Transport Ministry: the 2 trains in Upper Egypt's Sohag collided after unknown passengers pulled the emergency valve of the first train, causing it to stop and get smashed by the other one from behind.#Egypt#Sohag#Africa|#طهطا#سوهاج#مصرpic.twitter.com/FDT2vSBPL3
— Egypt Today Magazine (@EgyptTodayMag) March 26, 2021