पराभवानंतर तैवानच्या पंतप्रधानांचा राजीनामा
By admin | Published: November 30, 2014 02:18 AM2014-11-30T02:18:30+5:302014-11-30T02:18:30+5:30
तैवानचे पंतप्रधान जिआंग ई-हु यांनी शनिवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चीनसमर्थक सत्ताधारी पक्षाच्या पराभवानंतर राजीनामा दिला आहे.
Next
तैपेई : तैवानचे पंतप्रधान जिआंग ई-हु यांनी शनिवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चीनसमर्थक सत्ताधारी पक्षाच्या पराभवानंतर राजीनामा दिला आहे. कोमिंगतांग पक्षाचे देशातील जिल्ह्यांवरील नियंत्रण संपुष्टात आले असून यात राजधानी तैपेई महापौरपदाच्या निवडणुकीतही मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. शनिवारच्या निवडणुकीकडे चीनसोबतच्या संबंधांबाबतचे सार्वमत म्हणून पाहिले जात आहे. कोमिंगतांग पक्षाचे समर्थक चीनसोबत चांगले संबंध ठेवण्याच्या बाजूने आहेत तर चीन स्वायत्त तैवानवर आपला दावा सांगत आला आहे. यावरुन तैवानमध्ये टोकाचे मतभेद आहेत. चीन व तैवान हे अमेरिकेचे मित्रदेश आहेत.