OMG! सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी ट्रेनिंग देत होता; आता तालिबान सरकारमध्ये बनला मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:54 PM2021-09-08T18:54:17+5:302021-09-08T18:55:09+5:30

रिपोर्टनुसार, ताज मीरने पाकिस्तानच्या पेशावर इथं राहून जनरल अब्दुलला ठार करण्यासाठी मुल्ला शिरीनसोबत प्लॅनिंग केले होते.

Taj Meer Was training to become a suicide bomber; Now he has a minister in the Taliban government | OMG! सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी ट्रेनिंग देत होता; आता तालिबान सरकारमध्ये बनला मंत्री

OMG! सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी ट्रेनिंग देत होता; आता तालिबान सरकारमध्ये बनला मंत्री

Next

अफगाणिस्तान(Afghanistan) तालिबाननं(Taliban) सरकार बनवण्याची घोषणा केली. या सरकारमधील अनेक मंत्री त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. यातील काही मंत्री असे आहेत ज्यांच्यावर कोट्यवधीचं इनाम असून काहींना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तालिबानच्या कॅबिनेटमधील आणखी एक व्यक्ती ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. जो सुसाइड बॉम्बर म्हणजे आत्मघातकी हल्लेखोर तयार करण्याचं ट्रेनिंग सेंटर चालवत होता.

या व्यक्तीचं नाव ताज मीर जवाद आहे. तालिबानी मिलिट्री सेटअपचा एक महत्त्वाचा सदस्य ताज मीरला मानलं जातं. ताज मीरला गुप्तचर खात्याचा उपप्रमुख बनवण्यात आलं आहे. तो इंटेलीजेंस चीफ अब्दुल हकसोबत मिळून काम करणार आहे. ताज मीरबाबत अनेक सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, गेल्या काही वर्षात ताज मीरनं अनेक आत्मघातकी हल्ले केले आहेत. २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या गुत्पचर यंत्रणेचा प्रमुख रहमतुल्लाह नबीलने दावा केला होता की, ताज मीर अल हमजा बिग्रेड नावाचं ट्रेनिंग सेंटर चालवतो जो आत्मघातकी हल्ला करण्याचं ट्रेनिंग देतो. तालिबानविरोधात शहीद झालेले अफगाणिस्तानातील पोलीस प्रमुख जनरल अब्दुल राजिक यांना सुसाइड बॉम्बरनेच मारलं होतं. त्याला ताज मीरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

रिपोर्टनुसार, ताज मीरने पाकिस्तानच्या पेशावर इथं राहून जनरल अब्दुलला ठार करण्यासाठी मुल्ला शिरीनसोबत प्लॅनिंग केले होते. ताज मीर त्यावेळी बॉम्बवर प्रयोग करताना एका ब्लास्टमध्ये जखमीही झाला होता. ज्यानंतर आयएसआयनं ताज मीरला पाकिस्तानी पासपोर्ट देत श्रीलंकेला पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. ताज मीरचा कराचीमध्ये उपचार सुरू होता. जिहादी संघटनांबाबत बातम्या देणाऱ्या लॉन्ग वॉर जर्नलने सांगितले की, २०१३ मध्ये ताज मीर हा हक्कानी नेटवर्कमध्ये सीनियर कमांडर होता. त्याशिवाय दाऊद नावाचा व्यक्तीसोबत मिळून तो काबुल अटॅक नेटवर्क चालवत होता. हा नेटवर्क वारदक, लोगार, नंगरहार, कापिसा, पाकतिकासारख्या प्रदेशांवर हल्ला करत होते. अल-कायदा, लष्कर ए तोएबा, इस्लामिक मूवमेंट ऑफ उज्बेकिस्तान, हिज्ब ए इस्लामी गुलबुद्दीनसारख्या संघटनेच्या ऑपरेशनमध्ये त्याचा सहभाग होता.

केवळ ताज मीरच नव्हे तर तालिबानच्या अनेक मंत्र्यांचा खतरनाक क्रमिनिल रेकॉर्ड आहे. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याला अमेरिकेने ग्लोबल दहशतवादी ठरवत त्याच्यावर ३७ कोटींचे बक्षीस ठेवले आहे. त्याशिवाय तालिबानचे काही मंत्री अमेरिकेच्या खतरनाक ग्वांतनामो जेलमध्ये कैदी म्हणून होते. विशेष म्हणजे तालिबानच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात असलेले मसलन खैरुल्लाह खैरव्वा(माहिती व सांस्कृतिक मंत्री) अब्दुल हक(गुप्तचर खात्याचे प्रमुख) मुल्ला नुरुल्लाह नूरी( सीमाभागा संबंधातील मंत्री) हेदेखील अमेरिकेच्या जेलमधील कैदी होते.

Web Title: Taj Meer Was training to become a suicide bomber; Now he has a minister in the Taliban government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.