दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा; पाकिस्तानचा अफगाणिस्तान सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:57 AM2022-04-18T10:57:57+5:302022-04-18T11:07:17+5:30
गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधून सीमेपलीकडून हल्ल्यांमध्ये त्यांच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे.
पाकिस्ताननेअफगाणिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमधून सीमेपलीकडून हल्ल्यांमध्ये त्यांच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे. यावरून त्यांनी आता शेजारील देशातील तालिबान शासकांना अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अलीकडील घटनांबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाकचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत पाक-अफगाण सीमेवर घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तान सरकारला पाक-अफगाण सीमा क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी वारंवार विनंती केली आहे. कारण दहशतवादी पाकिस्तानमध्ये त्यांच्या कारवाया करण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करत आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान त्यांच्या सीमेवर प्रभावी समन्वय आणि सुरक्षेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा करत आहेत. दुर्दैवाने टीटीपी (तेहरिक-ए-तालिबान) सह सीमावर्ती भागातील प्रतिबंधित दहशतवादी गटांचे घटक पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा चौक्यांवर हल्ले करत आहेत, असे पाक परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.