परीक्षेला यायचंय.. आधी कपडे काढा - अमेरिकन प्राध्यापकाचा फतवा
By admin | Published: May 13, 2015 01:55 PM2015-05-13T13:55:33+5:302015-05-13T14:57:45+5:30
परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विवस्त्र होऊनच वर्गात यावे असा फतवा व्हिज्युअल आर्ट्सच्या विभागाने प्राध्यापकाने काढला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १३ - परीक्षाजवळ आल्या की त्यात चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करतात. पण अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या व्हिज्युअल आर्ट्स या विभागातील विद्यार्थ्यांसमोर भलतीच समस्या उभी ठाकली आहे. परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विवस्त्र होऊनच वर्गात यावे असा फतवा या विभागाच्या प्राध्यापकाने काढला आहे. या फतव्याला एका विद्यार्थिनीच्या आईने विरोध दर्शवला आहे.
यूसी सॅन डिएगो महाविद्यालयातील कला शाखेचे प्राध्यापक रिकार्डो डॉमिंगेस हे गेल्या अनेक वर्षांपासून व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना 'परफॉर्मिंग द सेल्फ' हा विषय शिकवत आहेत. या विषयाच्या अंतिम परीक्षेसाठी डॉमिंगेस यांनी विद्यार्थ्यांना अजब अट टाकली आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत नग्नावस्थेतच बसावे अशी अटच त्यांनी टाकली आहे. विद्यार्थ्यांनी असे न केल्यास ते नापासही होऊ शकतात असा धमकीवजा इशारा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे असा आरोप एका विद्यार्थिनीच्या आईने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
विशेष बाब म्हणजे डॉमिंगेस यांनी हे आरोप फेटाळलेले नाहीत. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांपासून परफॉर्मिंग द सेल्फ या विषयाची अंतिम परीक्षा याच पद्धतीने होत आहे. विद्यार्थ्यांनी अंधूक प्रकाश असलेल्या खोलीत विवस्त्रावस्थेतच स्वत:चे चित्र रेखाटायचे आहे. स्वतःला शोधण्यासाठी ही एक पद्धत आहे, यात गैर काहीच नाही असे सांगत डॉमिंगेस यांनी या निर्णयाचे समर्थन केले. तर मी माझ्या मुलीला यासाठी कॉलेजमध्ये पाठवत नाही, प्राध्यापकाचा फतवा ऐकून माझ्या पोटात गोळाच आला होता अशी प्रतिक्रिया त्या विद्यार्थीनीच्या आईने दिली.