Lata Mangeshkar Pakistan: 'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 08:48 PM2022-02-06T20:48:30+5:302022-02-06T20:49:13+5:30
Pakistani Loves Lata Mangeshkar: ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे, अशी एका चाहत्याने मागणी केली होती.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्कावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना महिनाभरापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शोक व्यक्त केला आहे.
इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले की, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जगातील एका मोठ्या गायिकेला गमावले आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील लोकांना आनंद मिळाला आहे.
With the death of Lata Mangeshkar the subcontinent has lost one of the truly great singers the world has known. Listening to her songs has given so much pleasure to so many people all over the world.
— Imran Khan (@ImranKhanPTI) February 6, 2022
लतादीदी आम्हाला द्या...
ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे. लतादीदींचे पाकिस्तानातही अनेक चाहते आहेत.
पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू...
लतादीदींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडालेला असताना सीमेपलीकडेही अनेक चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. शकील अहमद नावाच्या त्यांच्या चाहत्याने लिहिले की, लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:खी झालो. त्यांच्या पुढील जगातील प्रवासात शांती लाभो, भारताला विशेष प्रेम.
पाकिस्तानी पत्रकार आमिर रजा खान यांनी लता मंगेशकर यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करून म्हटले की, कोणाला माहिती होते, ही छोटी मुलगी संगीताच्या जगाची राणी होईल. लताजी तुम्ही आमच्या काळातील एक खरीखुरी महान व्यक्ती आहात. तुम्ही भारत, पाकिस्तान आणि संपूर्ण जगाच्या संगित प्रेमींच्या राणी आहात.
बाबर आझमने वाहिली श्रद्धांजली
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुवर्ण युगाचा अंत. त्यांचा जादुई आवाज आणि त्यांचा वारसा जगभरातल्या कोट्यवधी लोकांसोबत कायम राहील. त्यांच्यासारखा आयकॉन होऊ शकत नाही. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट बाबर आझमने केले आहे.