आमचा संघ घ्या पण कोहली द्या - पाकिस्तानी महिला पत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 06:22 PM2017-06-07T18:22:45+5:302017-06-07T18:22:45+5:30

पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने त्यांच्या संपूर्ण संघाच्या बदल्यात कोहली द्या अशी मागणी केली

Take our team but give Kohli - Pakistani woman journalist | आमचा संघ घ्या पण कोहली द्या - पाकिस्तानी महिला पत्रकार

आमचा संघ घ्या पण कोहली द्या - पाकिस्तानी महिला पत्रकार

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय कर्णधार विराट कोहलीचे फॅन्स संपूर्ण जगभरात आहे. पाकिस्तानमध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात भारताने पाकिस्तानाला 124 धावांनी लोळवतं विजयी सलमी दिली. या सामन्यात कोहलीने उत्कृष्ट नेतृत्व आणि फलंदाजीने विजयात मोलाचा वाटा उटलला होता. या सामन्यातील मानहाणीकारक पराभवानंतर पाकिस्तानमध्ये ळश् फोडण्यात आले. तसेच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर संघावर टीका करण्यात आली. सर्वच स्तरावरुन पाकिस्तानवर टीकेची झोड पडली. यामध्ये माध्यमानींही आपली भूमिका ठोस बजावली.
पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ घ्या मात्र विराट कोहली पाकिस्तानला द्या अशी अजब ऑफर भारताला ट्विट करत दिली. पाकिस्तानच्या पत्रकार नझराना गफ्फार यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आहे. भारताने आमची संपूर्ण टीम घ्यावी आणि एका वर्षासाठी कोहली आम्हाला द्यावा, असे ट्विट गफ्फार यांनी केले आहे. गफ्फार यांची ऑफर अपेक्षेप्रमाणे भारतीयांना पटलेली नाही. त्यामुळेच भारतीय क्रिकेट चाहत्यांची गफ्फार यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी संघाचा पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावरदेखील पाकिस्तानला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरासाठी कोहली आम्हाला द्या, ही पाकिस्तानी महिला पत्रकाराची ऑफर धुडकावून लावत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ह्यपाकिस्तान जेव्हापासून स्वतंत्र झाला आहे, तेव्हापासून काही ना काही मागतच असतो अशा खोचक टीका करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी नेटीझन्सनी त्या महिला पत्रकाराच्या ट्विटबद्दल नाराजी व्यक्त करत टीका केली.

Web Title: Take our team but give Kohli - Pakistani woman journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.