Afghanistan Crisis: 'तालिबानच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर', बायडन यांनी सांगितला ३१ ऑगस्टनंतरचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:49 AM2021-08-25T08:49:47+5:302021-08-25T08:50:13+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान करत असलेल्या कामांवर आणि कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे.

Taliban actions to be monitored says Joe Biden US has evacuated or facilitated to get around 70000 people out of Afghanistan | Afghanistan Crisis: 'तालिबानच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर', बायडन यांनी सांगितला ३१ ऑगस्टनंतरचा प्लान

Afghanistan Crisis: 'तालिबानच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर', बायडन यांनी सांगितला ३१ ऑगस्टनंतरचा प्लान

Next

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबान करत असलेल्या कामांवर आणि कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे माघार घेण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे याच पार्श्वभूमीवर बायडन बोलत होते. १४ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानातून आतापर्यंत अमेरिकेनं ७०,७०० नागरिकांची सुटका केली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. (Taliban actions to be monitored says Joe Biden US has evacuated or facilitated to get around 70000 people out of Afghanistan)

"जी-७ देश, युरोपीय संघ, नाटो आणि संयुक्त राष्ट्र तालिबानबाबतच्या दृष्टीकोनात आमच्यासोबत ठाम उभे आहेत. आम्ही तालिबान्यांचं ते करत असलेल्या कामांवरुन आणि व्यवहारांवरुन परीक्षण करू. त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल", असं बायडन व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जी-७ देशांमध्ये ब्रिटन, अलावा, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे. 

३१ ऑगस्टच्या डेडलाइननुसार अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून पूर्णपणे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण तालिबानच्या सहयोगावरही खूप काही अवलंबून आहे असंही बायडन म्हणाले. "आम्ही जितकी लवकर ही प्रक्रिया संपवू तितकं चांगलं आहे. पण ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तालिबाननं सहकार्य करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्यांना त्यांनी जर विमानतळापर्यंत येऊ दिलं आणि आमच्या मोहिमेत कोणताही अडथळा आला नाही, तर सर्व प्रक्रिया लवकरात लवकर संपेल", असं बायडन म्हणाले. 

Web Title: Taliban actions to be monitored says Joe Biden US has evacuated or facilitated to get around 70000 people out of Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.