भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:48 PM2021-08-31T15:48:22+5:302021-08-31T15:49:58+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाती सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

taliban and isi finiding supply chain of arms from india all afghan soldiers | भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

googlenewsNext

काबुल: 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबाननं देशात कब्जा केला. तालिबानच्या येण्यानं आता जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या सूत्रांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि तालिबान अफगाणिस्तानला मिळणाऱ्या भारतातील शस्त्रास्त्र आणि इतर हत्यारांच्या पुरवठा साखळीचा तपास करत आहे.

अधिकारी आयएसआयच्या रडारवर
सीएनएन-न्यूज 18 शी केलेल्या विशेष संभाषणात नाव न छापण्याच्या अटीवर, उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं की, सर्व एनडीएस अधिकारी, अफगाण सैनिक आयएसआय आणि तालिबानच्या रडारवर आहेत. आयएसआय फक्त भारत किंवा इंडियन मिलिटरी अकादमीवर नाही, तर आयएमएमध्ये प्रशिक्षित अधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवून आहे. काही अधिकारी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यानं दिली. तसेच, आयएसआयवर दहशतवादी संघटनांना निधी पुरवण्याचा, पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि प्रशिक्षण देण्याचा आरोप लावला आहे.

तालिबानच्या भीतीनं सैनिकांचं पलायन
15 ऑगस्ट रोजी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. त्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले होते. तसेच, तालिबानी सैनिकांकडून राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या (एनडीएस) सदस्यांचा शोध घेतला जातोय. याशिवाय, अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणी सैनिकांचाही तालिबानकडून शोध सुरू आहे. ISI आणि तालिबानच्या भीतीनं अनेक अफगाण सैनिक मिल्ट्री वाहनं आणि पिकअप ट्रकमधून इराणकडे जात आहेत. अफगाणिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याच्या मते, तालिबाननं अमेरिकेला मदत करणाऱ्यांची हिट लिस्ट तयार केली आहे. तसेच, अमेरिकेला मदत करणारे पुढे आले नाही, तर त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी तालिबानकडून देण्यात येतीय. 

Web Title: taliban and isi finiding supply chain of arms from india all afghan soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.