Afghanistan: तुर्कस्तानची लॉटरी लागली; काबुल विमानतळासाठी तालिबानने मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:42 AM2021-08-26T07:42:50+5:302021-08-26T07:43:28+5:30

Kabul airport in Turkey's Hand: काबुल विमानतळ सुरु ठेवणे तालिबानची गरज आहे. कारण असे न केल्यास जगाशी संपर्क तुटेल. तसेच दहशतवादी मदत, मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तू आदी पुरविण्यासाठी विमानतळ सुरु ठेवावाच लागणार आहे.

Taliban ask Turkey for technical help to run Kabul airport; After rejecting Erdogan's offer | Afghanistan: तुर्कस्तानची लॉटरी लागली; काबुल विमानतळासाठी तालिबानने मागितली मदत

Afghanistan: तुर्कस्तानची लॉटरी लागली; काबुल विमानतळासाठी तालिबानने मागितली मदत

Next

अंकारा: काबुल विमानतळावरून (Kabul airport) येत्या 31 ऑगस्टला अमेरिकेचे सैनिक माघारी जाणार आहेत. यामुळे विमानतळ चालविण्यासाठी तालिबानने (Taliban) तुर्कस्तानला (Turkey) निमंत्रण पाठविले आहे. हा विमानतळ सांभाळण्यासाठी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र, तालिबानने त्यांची मागणी दरवेळी फेटाळली होती. (Taliban asked Turkey for support to run Kabul airport, Turkish officials say.)

आता तालिबानने तुर्कस्तानला काबुल विमानतळासाठी मदत करण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या सैन्यासोबत काबुल विमानतळावर सध्या तुर्कीचे 200 सैनिक तैनात आहेत. तुर्कीकडून तांत्रिक मदत तालिबानने मागितली असली तरी देखील या सैनिकांना 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडावा लागणार आहे. 

रॉय़टर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. तालिबानने सैनिकांनी परत जाण्याची जी अट ठेवली आहे, त्यावरून निर्णय घेणे अंकारासाठी कठीण असेल. मुस्लिम राष्ट्र तुर्की अफगाणिस्तानातील मोहिमेंमध्ये नाटोचा हिस्सा होते. यामुळे आताही काबुल विमानतळावर तुर्कीचे शेकडो सैनिक तैनात आहेत. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही काळासाठी आपल्या सैनिकांना माघारी घेण्यासाठी आपण तयार आहोत. 

काबुल विमानतळ का हवाय...
एर्दोगन सरकारने तालिबान राज येण्यापूर्वी काही महिन्यांपासून काबुल विमानतळ चालविण्यास तयार असल्याचे मेसेज पोहोचविले होते. तेव्हा तालिबान नेत्यांनी ते फेटाळले आणि इशाराही दिला होता. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला तेव्हा तुर्कीने विमानतळावर तंत्रज्ञान आणि सुरक्षा मदत देण्याची ऑफर दिली होती. तेव्हाही तालिबानने ही ऑफर धुडकावली होती. यानंतर तुर्कीने त्यांचा मित्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. 

काबुल विमानतळ सुरु ठेवणे तालिबानची गरज आहे. कारण असे न केल्यास जगाशी संपर्क तुटेल. तसेच दहशतवादी मदत, मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तू आदी पुरविण्यासाठी विमानतळ सुरु ठेवावाच लागणार आहे. तालिबानी नेते देखील विमानतळ बंद झाला तर त्यांच्या मित्र देशांना भेटी देऊ शकणार नाहीत. 

Web Title: Taliban ask Turkey for technical help to run Kabul airport; After rejecting Erdogan's offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.