अफगाणिस्तानात तालिबानचा हल्ला; २ जणांचा मृत्यू तर ३२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 07:23 AM2016-11-11T07:23:20+5:302016-11-11T07:23:20+5:30
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागात असलेल्या मजार-ए-शरीफ या शहरात असणाऱ्या जर्मन दूतवासाबाहेर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मजार-ए-शरीफ, दि. ११ - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तर भागात असलेल्या मजार-ए-शरीफ या शहरात असणाऱ्या जर्मन दूतवासाबाहेर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात ३२ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तालिबानने दोन ट्रकबॉम्बचा वापर करत हा हल्ला घडवून आणला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार तालिबानचे लक्ष हे जर्मन दूतावास होते. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले दोन ट्रक्स जर्मन दूतावासाच्या आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे कडक सुरक्षा असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे दहशतवाद्यांनी दूतावासाबोहरील भिंतीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक धडकवला.
#FLASH: Explosion and gun battle at German Consulate in Afghanistan's city of Mazar-e-Sharif
— ANI (@ANI_news) 11 November 2016
सविस्तर वृत्त लवकरच...