Afghanistan: तालिबानचा पंजशीरच्या पाठीत वार; अमेरिका जाताच भीषण हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:47 AM2021-08-31T09:47:31+5:302021-08-31T09:47:55+5:30
Taliban Attack In Panjshir: तालिबानविरोधात लढण्याचा बिगुल फुंकणारे नेते अहमद मसूद यांच्या गोटातील सुत्रांनी याची माहिती दिली आहे. टोलो न्यूजनुसार तालिबानच्य़ा दहशतवाद्यांनी पंजशीरच्या एका चौकीवर भीषण हल्ला चढविला.
काबूल: काही दिवसांपूर्वीच तालिबानने (Taliban) पंजशीरसोबत (Panjshir) शस्त्रसंधी केल्याची घोषणा केली होती. तसेच एकही गोळी झाडणार नाही, तणाव निर्माण करणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतू अमेरिकेचे काबूल विमानतळावरून शेवटचे विमान उडताच तालिबानने पंजशीरच्या चौकीवर भीषण हल्ला केला आहे. (Taliban Attack In Panjshir Valley Afghanistan)
Afghanistan: तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चा
तालिबानविरोधात लढण्याचा बिगुल फुंकणारे नेते अहमद मसूद यांच्या गोटातील सुत्रांनी याची माहिती दिली आहे. टोलो न्यूजनुसार तालिबानच्य़ा दहशतवाद्यांनी पंजशीरच्या एका चौकीवर भीषण हल्ला चढविला. हा हल्ला आपल्या योद्ध्यांनी परतवून लावला आहे. दोन्ही बाजुंकडून चर्चा सुरु असताना तसेच तालिबानने शस्त्रसंधी जाहीर केली असताना हा हल्ला झाल्याने संघर्ष अटळ मानला जात आहे.
दुसरीकडे तालिबानने यावर काही वक्तव्य केलेल नाही. तालिबानने हा हल्ला जाबुल सिराज भागात केला आहे जो परवान प्रांताचा हिस्सा आहे. या हल्ल्यात पंजशीर आणि तालिबानचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच जखमी झाले आहेत.
Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय
Afghanistan: पंजशीरमध्ये अफगाण योद्ध्यांनी केलेले स्वागत पाहून तालिबानी हादरले; Video व्हायरल
तालिबान काय म्हणालेले...
अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुल ताब्यात घेऊन राजवट स्थापन करण्याच्या तयारीत तालिबान (Taliban) आहे. परंतू अफगानिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक असलेला हा पंजशीर (Panjshir) प्रांत ना कधी सोव्हिएत रशियाच्या ताब्यात आला ना आधीच्या तालिबान राजवटीच्या. पंजशीरने तालिबानसमोर सरेंडर केले असते तर ती एक मोठी घटना असली असती. तालिबानने तसा प्रयत्नही केला. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी देखील पाठविले होते. परंतू, एकाच झटक्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांना पंजशीरच्या लढवय्यांनी मारले होते. तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर करून टाकले होते. दोन्ही गटांमध्ये जोरदार लढाई सुरु होती.