Afghanistan: काबुल फक्त 130 किमी! वेशीवर आलेल्या तालिबानला मोठी ऑफर; सत्तेत वाटा देऊ, पण एका अटीवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:32 PM2021-08-12T15:32:19+5:302021-08-12T15:33:05+5:30

Afghanistan offer to Taliban share power: अफगान सरकारचा हा प्रस्ताव अशावेळी आला आहे, जेव्हा तालिबानने 10 वी प्रांतीय राजधानी गजनी शहर ताब्यात घेतले आहे. तालिबानची चाल पाहता ते अफगान सरकारचा प्रस्ताव स्वीकारतील असे वाटत नाही.

Taliban Capture Ghazni City, 130 Km From Afghan Capital; Gani gave offer power to tailban | Afghanistan: काबुल फक्त 130 किमी! वेशीवर आलेल्या तालिबानला मोठी ऑफर; सत्तेत वाटा देऊ, पण एका अटीवर...

Afghanistan: काबुल फक्त 130 किमी! वेशीवर आलेल्या तालिबानला मोठी ऑफर; सत्तेत वाटा देऊ, पण एका अटीवर...

Next

काबुल: अमेरिका आणि नाटोच्या सैन्याने अफगानिस्तान (Afghanistan) सोडल्याने तालिबानने पुन्हा डोके वर काढले आहे. तब्बल 65 टक्के देश ताब्यात घेतला असून आता मजार-ए-शरीफ शहराला वेढा घातला आहे. यामुळे अफगानिस्तानची सत्ता गेली तर तालिबान जिवंत सोडणार नाही, या भीतीने सत्ताधारी नेते, मंत्री आणि बडे अधिकारी चिंतेत आहेत. यामुळे अफगान सरकारने तालिबानला (Taliban) सत्तेत वाटा देण्याची मोठी ऑफर ठेवली आहे. (Afghanistan Govt Offers Share in Power to Taliban, Demands Take Over of Cities to Stop, Says Local Media)

अशरफ गनी सरकारने आज मजार-ए-शरीफ शहरात महत्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये तालिबनसमोर शांती प्रस्ताव ठेवण्यात आला. यानुसार तालिबानला सत्तेत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, एक अट ठेवण्यात आली आहे. तालिबानने अफगानिस्तानमधील विविध भागांतील हल्ले बंद करावेत, तरच सत्तेत भागीदारी दिली जाईल असे गनी यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे. 

तालिबानने लढाऊ विमानांचे पायलट, सत्ताधारी नेते यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या हल्ल्यांत आठ पायलटांची हत्या करण्यात आली आहे. त्यांना घरातून बाहेर पडताना, बाजारात, रस्त्यावर गाठून मारले जात आहे. यामुळे अनेक पायलटांनी राजीनामा देऊन घरी बसणे पसंत केले आहे. अफगानिस्तानचे कार्यवाहू अर्थ मंत्री खालिद पायंडा यांनी राजीनामा दिला आहे. ब्लूमबर्ग मीडिया नेटवर्कनुसार पायंडा यांनी राजीनामा दिला असून देशाच्या मुख्य सीमा शुल्क चौक्यांवर तालिबानने कब्जा केल्याने त्यांनी देश सोडला आहे. दुसरीकडे पायंडा यांनीदेखील ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली आहे. 

अफगान सरकारचा हा प्रस्ताव अशावेळी आला आहे, जेव्हा तालिबानने 10 वी प्रांतीय राजधानी गजनी शहर ताब्यात घेतले आहे. तालिबानची चाल पाहता ते अफगान सरकारचा प्रस्ताव स्वीकारतील असे वाटत नाही. कारण त्यांचे दहशतवादी एका मागोमाग एक शहरे ताब्यात घेत आहेत. गजनी शहर हे काबुलपासून फक्त 130 किमी दूर आहे. यामुळे तालिबाना एकूण वेग पाहता येत्या पंधरवड्यात काबुलही पडण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेने काबुल तालिबानच्या ताब्यात जाण्यासाठी 90 दिवस लागतील असे म्हटले आहे. 

Web Title: Taliban Capture Ghazni City, 130 Km From Afghan Capital; Gani gave offer power to tailban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.