AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:30 PM2021-09-09T17:30:14+5:302021-09-09T17:31:58+5:30
तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत.
काबूल - आपल्याला अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारबद्दल माहिती असेलच. आपल्याला हेही माहित असेलच, की पंतप्रधान, उपपंतप्रधान ते गृहमंत्र्यांपर्यंत मंत्रिमंडळातील जवळपास १४ सदस्य हे संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीतील दहशतवादी आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक 'दा अफगाणिस्तान बँके'चा (DAB) बंदूकधारी प्रमुख हाजी मोहम्मद इद्रिसचा (haji mohammad idris) फोटोही व्हायरल झाला आहे. यात तो कार्यालयात बसून लॅपटॉप चालवताना दिसत आहे आणि त्याच्या टेबलवर बंदूकही ठेवण्यात आलेली आहे. (Taliban da Afghanistan bank chief haji mohammad idris pics with gun goes viral)
तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत.
ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...
जबीहुल्ला मुजाहिदने एक ट्विट करत, "सरकारी संस्था आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी आणि लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी हाजी मोहम्मद इद्रिसची डीएबीचा कार्यवाहक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले होते. हाजी मोहम्मद इद्रिस हा अफगाणिस्तानातील जौझानचा रहिवासी आहे आणि तो तालिबानच्या आर्थिक आयोगाचा प्रमुख राहिला आहे.
Mulla Haji Mohammad Idris, the new Governor of the Afghanistan's central bank -- Da Afghanistan Bank (DAB). #Afghanistan 👇👇👇👇👇 pic.twitter.com/Q5WOUIHq3W
— Jameel Farooqui (@FarooquiJameel) September 9, 2021
अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण
तालिबान सरकारच्या मदतीसाठी चीनची ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा -
तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आताच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीत आहेत. मात्र, चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे याचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात चीन अफगाणिस्तानला ३० लाख लसीही दान म्हणून देणार असल्याचे समजते.