Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:41 PM2021-08-16T15:41:38+5:302021-08-16T15:44:55+5:30

Taliban Sex Slaves: महिलांना गेल्या 20 वर्षांत मिळालेले स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर सेक्स गुलामांच्या नरकातही आयुष्य जगण्याची टांगती तलवार या महिलांवर आली आहे. 

Taliban demand list of above 15 years girls and widow's list for sex slaves; womens in trouble in Afghanistan | Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट

Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट

googlenewsNext

अफगानिस्तानातून (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पलायन केल्याने आता तालिबानचेच (Taliban) एकहाती वर्चस्व राहण्याची चिन्हे आहेत. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केली. यावेळी झालेल्या फायरिंगमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणी संकटात सापडल्या आहेत. (Taliban demand list of above 15 years girls and widow's list for sex slaves)

ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट

तालिबानने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या 15 वर्षांवरील तरुणी आणि विधवा महिलांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. तसेच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत होते. या महिलांना उचलून नेत सेक्स गुलाम बनविले जात होते. तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. तेथील काही महिलांनी कशीबशी सुटका करून घेऊन आयएसआयएस दहशतवाद्यांच्या कृत्याचा भांडाफोड केला होता.

Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले

आता तालिबानने मागविलेल्या यादीतील मुलींना तालिबानच्या दहशतवाद्यांशी लग्न करावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच तालिबानने हिंसा करण्यास सुरुवात केली आहे. अफगानिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. तालिबानने तरुणी आणि विधवा महिलांची यादी मागविली होती. यावर अद्याप मौलवींनी काम केले की नाही याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जबरदस्तीने लग्ने लावली तर या महिलांना पाकिस्तानच्या वजीरीस्तान येथे नेले जाईल आणि पुन्हा त्यांना प्रशिक्षण देऊन प्रामाणिक इस्लाममध्ये परावर्तित केले जाईल. 

तालिबानने 1996 मध्ये महिलांचे शिक्षण, रोजगार आदीपासून दुर ठेवत त्यांना बुरखा वापरण्यास बंधनकारक केले होते. तसेच पुरुषाशिवाय बाजारात जाण्यावर बंदी आणली होती. तसेच काहीसे क्रूर निर्णय तालिबान घेण्याची शक्यता आहे. तसे संकेत दिले असून महिलांना गेल्या 20 वर्षांत मिळालेले स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर सेक्स गुलामांच्या नरकातही आयुष्य जगण्याची टांगती तलवार या महिलांवर आली आहे. 

Web Title: Taliban demand list of above 15 years girls and widow's list for sex slaves; womens in trouble in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.