तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 06:45 PM2021-09-02T18:45:00+5:302021-09-02T18:45:00+5:30

अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले.

Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers know about tha the supreme leader and pm | तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

Next

काबूल - अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, आता तालिबान शुक्रवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा शुक्रवारच्या नमाजानंतर केली जाईल. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. आता अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या वर्चस्वाखाली आला आहे. अमेरिकेन आपले सैन्य सोमवारी रात्रीच अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. (Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers)

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्या बाहेर पडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला होता. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले.

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

कोन असेल अफगाणिस्तानचा सुप्रीम लिडर?
अफगानिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा या सरकारचा सर्वेसर्वा अर्थात सुप्रीम लिडर असेल आणि पंतप्रधान अथवा राष्ट्रपती त्यांच्या आदेशावरच काम करतील. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनामुल्ला समांगनी याने म्हटले आहे, की "नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही जाहीर करू ते इस्लामीक सरकार, लोकांसाठी आदर्श सरकार असेल. अखुंदजादाच्या नेतृत्वात सरकार बनण्यासंदर्भात कसल्याही प्रकारची शंका नाही. तो सरकारचा प्रमुख असेल, यावरबाबत कुठलाही प्रश्न उद्भवत नाही."

"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

कंधारमधून काम करतील अखुंदजादा?
मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे याआधी कधी समोर आले नाहीत. त्यांच्या ठिकाणांबद्दल कोणाला खास माहिती नाही. ते नवीन सरकारमध्ये कंधारमधून काम करतील असे समजते. एका वृत्तानुसार, तालिबानने यापूर्वीच विविध प्रांत आणि जिल्ह्यांसाठी राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नेमले आहेत.

Web Title: Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers know about tha the supreme leader and pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.