हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:43 PM2021-08-30T19:43:05+5:302021-08-30T19:43:45+5:30

रविवारी तालिबानच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी सैनिकांचा जीव गेला. यापूर्वी गुरुवारीही तालिबानने एका पाकिस्तानी सैनिकाला ठार केले.

Taliban kill Pakistani soldiers; Still, Pakistan is 'busy' in their help | हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

googlenewsNext

एकीकडे तालिबानपाकिस्तानीसैनिकांचा जीव घेत आहे. अफगाण सीमेवरून सातत्याने त्यांच्यावर फायरिंग सुरू आहे. रविवारी तालिबानच्या गोळीबारात दोन पाकिस्तानीसैनिकांचा जीव गेला. यापूर्वी गुरुवारीही तालिबानने एका पाकिस्तानी सैनिकाला ठार केले. असे असतानाही दुसरीकडे मात्र, पाकिस्तान तालिबानच्याच सेवेत मशगूल असल्याचे दिसत आहे. (Taliban kill Pakistani soldiers; Still, Pakistan is 'busy' in their help)

आजची स्थिती अशी आहे, की प्रत्येकजण तालिबानच्या छायेपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत आहे. मात्र, पाकिस्तानने तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांत वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात, अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

शिकवतायत माणूसकी -
मन्सूर अहमद खान यांच्या घोषणेनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे कारगो विमान जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय साहित्य घेऊन इस्लामाबादहून मजार-ए-शरीफ येथे जाईल. मजार-ए-शरीफ या शहरावर तालिबानने 14 ऑगस्टलाच ताबा मिळविला होता. मन्सूर अहमद खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने हे एक मानवतावादी पाऊल असेल. अफगाणिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हे विमान अफगाणिस्तानात केव्हा उतरणार, यासंदर्भात स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

मजार-ए-शरीफ हे अफगाणिस्तानातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असून बाख प्रांताची राजधानी आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच तालिबानने या शहरावर कब्जा केला होता. यानंतर 15 ऑगस्टला तालिबानने काबूलवर कब्जा केला होता. यानंतर अफगाण राष्ट्रपती देश सोडून पळून गेले होते आणि आता तालिबानी दहशतवाद्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानात हाहाकार माजवला आहे. 

Web Title: Taliban kill Pakistani soldiers; Still, Pakistan is 'busy' in their help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.