Taliban: रक्तरंजित तालिबान! सर्वोच्च नेता हैबतुल्‍ला अखूंदजादा ठार; बरादर अटकेत, रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:24 AM2021-09-21T10:24:30+5:302021-09-21T10:29:30+5:30

Taliban supreme leader Haibatullah Akhundzada dead: हा हल्ला हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेवरून झाल्याचे समजते आहे. हक्कानी नेटवर्कने तालिबानी नेत्यांवर हल्ला केला व विजयी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयने देखील हक्कानीला साथ दिल्याचे समजते. 

Taliban leader Mullah Baradar held hostage, Haibatullah Akhundzada dead in haqqani attack: Report | Taliban: रक्तरंजित तालिबान! सर्वोच्च नेता हैबतुल्‍ला अखूंदजादा ठार; बरादर अटकेत, रिपोर्ट

Taliban: रक्तरंजित तालिबान! सर्वोच्च नेता हैबतुल्‍ला अखूंदजादा ठार; बरादर अटकेत, रिपोर्ट

googlenewsNext

काबूल: अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविल्यानंतर बराच काळ सत्तेतील वाटणीत गेला. यानंतर आता तालिबान- हक्कानीमध्ये (Taliban) रक्तरंजित संघर्ष उफाळल्याचे वृत्त येत आहे. तालिबानी नेता मुल्ला बरादरला ताब्यात घेऊन बंधक बनविण्यात आले आहे. तर तालिबानचा सुप्रिम लीडर हैबतुल्‍ला अखूंदजादाच्या मृत्यू झाल्याचे समजते आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अफगाणिस्तानमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आल्याचे दिसत आहे. (Taliban leader Mullah Baradar held hostage, Haibatullah Akhundzada dead: Report)

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

ब्रिटनचे वृत्तपत्र द सस्पेक्टरने सोमवारी याबाबतचे वृत्त दिले आहे. तालिबानमध्ये झालेल्या सत्तासंघर्षाच्या चकमकीत उप राष्ट्राध्यक्ष मुल्ला बरादर आणि दहशतवादी संघटनेचा सुप्रिम लीडर हैबतुल्‍ला गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा हल्ला हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेवरून झाल्याचे समजते आहे. हक्कानी नेटवर्कने तालिबानी नेत्यांवर हल्ला केला व विजयी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयने देखील हक्कानीला साथ दिल्याचे समजते. 

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

हा संघर्ष राष्ट्राध्यक्ष भवनातच झाला. यानंतर मुल्ला बरादरने एक लिहिलेले भाषण टीव्हीवर केले. यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आल्याची शक्यता वाढली आहे. मुल्ला दबावात असून त्याच्याकडून हे जबरदस्तीने वाचून घेण्यात आल्याचा अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. हा हल्ल्यावेळी फर्नीचर आणि चहाचे मोठमोठे थर्मास देखील एकमेकांवर फेकून मारण्यात आले होते. यानंतर हक्कानी नेटवर्कचा नेता खलील उल रहमान याने आपली खूर्ची उचलून मुल्ला बरादरला मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात अखूंदजादा देखील गंभीर जखमी झाला, नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: Taliban leader Mullah Baradar held hostage, Haibatullah Akhundzada dead in haqqani attack: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.