VIDEO : रिपोर्टरने महिलेबाबत विचारला प्रश्न, ऐकताच हसू लागले तालिबानी; म्हणाले - कॅमेरा बंद करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:14 PM2021-08-18T12:14:42+5:302021-08-18T12:15:01+5:30
महिला रिपोर्टरने जेव्हा तालिबान्यांना कॅमेरासमोर महिलांसंबंधी प्रश्न विचारला तर ते खिल्ली उडवत हसू लागले होते.
अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) तालिबानने (Taliban) आता आपला पूर्णपणे ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेबाबत जगाला जाणून घ्यायचं आहे. अशात एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो तालिबानचा खोटा बुरखा फाडतो. महिला राजकारणात येण्यावरून आणि त्यांना मतदान करण्याच्या प्रश्नावर तालिबानी हसताना दिसते. महिला रिपोर्टरने जेव्हा तालिबान्यांना कॅमेरासमोर महिलांसंबंधी प्रश्न विचारला तर ते खिल्ली उडवत हसू लागले होते.
हा व्हिडीओ जुना आहे. तेव्हा तालिबान्यांनी १९९६ आणि २००१ मध्ये अफगाणिस्तानवर शासन केलं होतं. आधीच्या आणि आताच्या तालिबानमध्ये बराच फरक बघायला मिळत आहे. जुन्या व्हिडीओबाबत सांगायचं तर त्यावेळी महिला रिपोर्टरने तालिबान्यांना प्रश्न विचारला होता की, काय महिला नेत्यांना अफगाणी मतदान करतील? त्यांनी निवडणूक लढण्यास स्वातंत्र मिळेल? यावर ते जोरजोरात हसू लागले होते आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितला. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला. (हे पण वाचा : Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष)
Taliban collapses with laughter as journalist asks if they would be willing to accept democratic governance that voted in female politicians - and then tells camera to stop filming. “It made me laugh” he says.pic.twitter.com/km0s1Lkzx5
— David Patrikarakos (@dpatrikarakos) August 17, 2021
एका डॉक्युमेंट्रीच्या एका एपिसोडची एक छोटी क्लीप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा १५ ऑगस्टला पूर्ण झाला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन तालिबान नेतृत्वानने स्पष्ट केलं की तालिबान गेल्या २० वर्षात बदलला आहे.
तालिबान नेतृत्वाने मंगळवारी सांगितलं की, महिलांना इस्लामी कायद्यानुसार स्वातंत्र्य असेल. हा संकेत दिला आहे की, तालिबान बुरक्याला अनिवार्य करणार नाही. पण हिजाब अनिवार्य असेल.