अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:49 IST2021-10-08T16:35:57+5:302021-10-08T17:49:29+5:30
यापूर्वी रविवारी काबुलमधील एका मशिदीबाहेर मोठा स्फोट झाला होता.

अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात मोठा बॉम्बस्फोट, 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर अनेक जखमी
काबुल:अफगाणिस्तानाततालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेकदा देशात बॉम्बस्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता परत एकदा एका मोठ्या बॉम्बस्फोठाने अफगाणिस्तान हदरलंय. अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, हा स्फोट शिया मशिदीजवळ झाला.
रविवारीही स्फोट झाला
यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी काबुलमधील एका मशिदीबाहेर जीवघेणा बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 5 नागरिक ठार झाले होते. तालिबानी अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्फोटात मृत्यू झालेले लोक तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मशिदीत जमले होते. त्या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नसली तरी, इस्लामिक स्टेटवर संशय आहे. ऑगस्ट महिन्यात काबुल ताब्यात घेतल्यापासून IS कडून तालिबानवर अनेक हल्ले करण्यात आले आहेत.
विमानतळाव सर्वात मोठा स्फोट
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आयएसकडून होणारे हल्ले वाढले आहेत. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने काबुल विमानतळाबाहेर मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात 169 हून अधिक अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते.