तालिबानच्या क्रुरतेचा अजून एक VIDEO, सरकारी अधिकारी आणि सैनिकांना घरात घुसून पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:19 PM2021-10-08T13:19:20+5:302021-10-08T18:47:06+5:30

अफगाणिस्तानातील मुक्त पत्रकार हिजबुल्लाह खानने त्यांच्या ट्विटरवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Taliban News in Marathi, Another VIDEO of Taliban brutality, government officials and soldiers captured from their homes | तालिबानच्या क्रुरतेचा अजून एक VIDEO, सरकारी अधिकारी आणि सैनिकांना घरात घुसून पकडलं

तालिबानच्या क्रुरतेचा अजून एक VIDEO, सरकारी अधिकारी आणि सैनिकांना घरात घुसून पकडलं

Next

काबुल: 20 वर्षानंतर अफगाणिस्तानची सत्ता काबील केल्यानंतर तालिबानने सर्वांना सार्वजनिक माफी जाहीर केली होती. तसेच, या आधीच्या सत्तेप्रमाणे क्रुर सरकार चालवणार नसल्याचे आश्वासनही दिले होते. पण, आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर तालिबान हळुहळू आपल्या जुन्या आवतारात येताना दिसत आहे.

तालिबान सत्ते आल्यापासून अफगाणिस्तानातील तालिबानच्या क्रुरतेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आता परत एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तालिबानची सत्ता आल्यापासून देशातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी भीतीमध्ये जगत आहेत. त्याचे कारण म्हणजे, तालिबान आता अशरफ घनी सरकारमध्ये एकनिष्ठ असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा घरोघरी जाऊन शोध घेतला जातोय.

अफगाणिस्तानचे मुक्त पत्रकार हिज्बुल्लाह खान यांनी याबाबतचा एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. या व्हिडिओत तालिबानी सैनिक सरकारी अधिकारी आणि अफगाण सैनिकांना घरातून उछलून नेताना दिसत आहेत. पत्रकार हिजबुल्ला खान यांनी ट्विट करत लिहीले की, "मागील सरकारचे अधिकारी आणि अफगाण सैनिकांना पकडण्यासाठी तालिबानचे संपूर्ण अफगाणिस्तानात घरोघरी ऑपरेशन चालू आहे." या व्हिडिओमध्ये काही सशस्त्र तालिबान सैनिक वाहनात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन नागरिकांचे हात बांधलेले दिसत आहेत.
 

Web Title: Taliban News in Marathi, Another VIDEO of Taliban brutality, government officials and soldiers captured from their homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.