Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:58 PM2021-08-17T18:58:02+5:302021-08-17T18:58:42+5:30

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे.

taliban released 2300 terrorists maulvi faqir mohammad ttp tehreek e taliban from afghanistan prisons | Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

Next

तालिबाननंअफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज करताच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० खतरनाक दशतवाद्यांची मुक्तता केली आहे. यात टीटीपीचे उपाध्यक्ष फकीर मोहम्मदचाही समावेश आहे. तुरुंगातून मुक्त करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तहरिक-ए-तालिबान, अल कायदा आणि आयएसआयएस संघटनेतील दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे सर्व अफगाणिस्तानातील विविध तुरुंगांमध्ये जेरबंद होते. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी काही कैद्यांची तर गेल्याच आठवड्यात मुक्तता करण्यात आली आहे. हे कैदी कंधार, बगराम आणि काबुल येथील तुरुंगामध्ये कैद होते. मौलवी फकीर मोहम्मद हे टीटीपीचे माजी उपाध्यक्ष होते. त्यांची सुटका पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी देखील चिंतेची बाब मानली जात आहे. 

अफगाणिस्तानात लष्कर-ए-तयैबाचेही दहशतवादी
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तष्कर-ए-तैयबा आणि लष्कर-ए-झांगवीचंही अफगाणिस्तानमध्ये अस्तित्व आहे. दोन्ही संघटना काबुलमध्ये तालिबानसोबत काम करत आहेत. तालिबाननं १५ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण प्राप्त केलं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अशरफ गनी यांनी एक हेलिकॉप्टर भरून पैसा घेऊन पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. तालिबाननं कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून शेकडो अफगाणी नागरिक अफगाणिस्तानमधून पळ काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Web Title: taliban released 2300 terrorists maulvi faqir mohammad ttp tehreek e taliban from afghanistan prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.