Taliban on Kashmir: “तालिबानला काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा अधिकार”; प्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 05:19 PM2021-09-03T17:19:25+5:302021-09-03T17:20:57+5:30

Taliban on Kashmir: तालिबानला काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे.

taliban said we have right to raise voice for muslims anywhere including kashmir | Taliban on Kashmir: “तालिबानला काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा अधिकार”; प्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

Taliban on Kashmir: “तालिबानला काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा अधिकार”; प्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देकाश्मीरच्या मुद्द्यावरून तालिबानने केले घूमजाव तालिबानला काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा अधिकारप्रवक्त्यांनी स्पष्ट केली भूमिका

काबूल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत तालिबान आहे. इराणच्या धर्तीवर तालिबान सरकार स्थापन करणार असून, सरकारमधील नेते निश्चित करण्यात आले आहेत. अलीकडेच पाकिस्तान आणि काश्मीर वादाबाबत तटस्थ भूमिका घेणाऱ्या तालिबानने काही दिवसांत घूमजाव केल्याचे पाहायला मिळत आहे. तालिबानला काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे. (taliban said we have right to raise voice for muslims anywhere including kashmir)

“...तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाटही ओसरेल, पण…” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले

पाकिस्तानकडून तालिबानचा वापर फुटीरतावादी अजेंड्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच काश्मीरमध्ये इस्लामी भावना भडकावण्यासाठी केला जाण्याची शक्यता यानंतर व्यक्त करण्यात आली आहे. एका संकेतस्थळाशी ऑनलाइन पद्धतीने बोलताना, तालिबानला काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचा दावा तालिबान प्रवक्ता सुहैल शाहीनने म्हटले आहे. 

“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

आम्ही आवाज उठवू

मुस्लीम म्हणून तालिबानला भारतातील काश्मीमध्ये किंवा अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उंचावण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू आणि मुस्लीम हे तुमचेच लोक आहेत. तुमच्याच देशाचे नागरिक आहेत. तुमच्या कायद्याप्रमाणे ते सर्व समान आहेत, असे शाहीनने म्हटले आहे. यापूर्वी भारताने काश्मीर खोऱ्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. भारत आणि पाकिस्तानने एकत्र बसून काश्मीर मुद्यावर तोडगा काढायला हवा. कारण दोन्ही शेजारी देश आहेत तसेच या दोन्ही देशांचे हित एकमेकांशी निगडीत आहे, असे तालिबानने म्हटले होते. 

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

दरम्यान, अफगाणिस्तानात वर्चस्व मिळवल्याबद्दल तालिबानला शुभेच्छा देताना अलकायदा या दहशतवादी संघटनेने आपल्या संदेशात इस्लामच्या शत्रुंच्या तावडीतून काश्मीर तसेच इतर तथाकथित इस्लामी भूमींना मुक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात आगामी काळात दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटना इसिस खुरासानकडून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
 

Web Title: taliban said we have right to raise voice for muslims anywhere including kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.