Afghanistan Taliban Crisis: अखेरच्या क्षणापर्यंत ‘ती’ तालिबानींशी लढत राहिली; महिला गवर्नर सलीमा मजीराला पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:32 AM2021-08-18T11:32:16+5:302021-08-18T11:35:25+5:30

सलीमा मजारी यांनी तालिबानींविरोधात लढण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचा निर्णय घेतला होता. अखेरच्या क्षणापर्यंत सलीमा अफगाणिस्तान वाचवण्यासाठी तालिबानविरुद्ध लढत राहिली.

Taliban: Salima Mazari, who took up arms to fight Taliban in Balkh Province,captured in Afghanistan | Afghanistan Taliban Crisis: अखेरच्या क्षणापर्यंत ‘ती’ तालिबानींशी लढत राहिली; महिला गवर्नर सलीमा मजीराला पकडलं

Afghanistan Taliban Crisis: अखेरच्या क्षणापर्यंत ‘ती’ तालिबानींशी लढत राहिली; महिला गवर्नर सलीमा मजीराला पकडलं

googlenewsNext
ठळक मुद्देअफगाणिस्तानात एकूण ३ महिला गवर्नर होत्या त्यापैकी एक सलीमा मजारी आहेहा परिसर हाती घेण्यासाठी तालिबानच्या नाकीनऊ आले. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागलासलीमा मजारी यांचा जन्म इराणमध्ये झाला होता. परंतु सेव्हियत युद्धामध्ये ती अफगाणिस्तानात आली.

अफगाणिस्तान(Afghanistan) वर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान एकीकडे सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे तालिबानींनी त्यांचा खरा चेहरा दाखवण्यासही सुरुवात केली आहे. माहितीनुसार, तालिबानने सलीमा मजारीला(Salima Mazari) पकडलं आहे. सलीमा अफगाणिस्तानातीह पहिली महिला गवर्नर आहे. ज्यांनी मागील काही काळापासून तालिबानविरोधात आवाज बुलंद केला होता.

सलीमा मजारी यांनी तालिबानींविरोधात लढण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचा निर्णय घेतला होता. अखेरच्या क्षणापर्यंत सलीमा अफगाणिस्तान वाचवण्यासाठी तालिबानविरुद्ध लढत राहिली. जेव्हा अफगाणिस्तानातील अन्य नेते देश सोडून पळून जात होते तेव्हा सलीमा मजीरा एकटी तिच्या समर्थकांसह तालिबानविरोधात उभी होती. अफगाणिस्तानातील बल्ख प्रांत तालिबानच्या कब्जामध्ये आला. तेव्हा त्याठिकाणच्या चाहर जिल्ह्यात सलीमा मजारी तालिबानच्या विळख्यात अडकली.

इराणमध्ये जन्मली अन् तालिबानविरुद्ध लढली

अफगाणिस्तानात एकूण ३ महिला गवर्नर होत्या त्यापैकी एक सलीमा मजारी आहे. त्यांच्या चाहर येथील भागात ३२ हजाराहून अधिक लोकसंख्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सलीमा यांनी तालिबानला त्यांच्या परिसरावर कब्जा करु दिला नाही. हा परिसर हाती घेण्यासाठी तालिबानच्या नाकीनऊ आले. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. सलीमा मजारी यांचा जन्म इराणमध्ये झाला होता. परंतु सेव्हियत युद्धामध्ये ती अफगाणिस्तानात आली. सलीमा यांनी तेहरान विद्यापीठातून त्यांचे शिक्षण घेतले. परंतु त्यानंतर सलीमा अफगाणिस्तानमधल्या राजकारणात सक्रीय झाल्या. त्यानंतर तालिबानविरोधात लढण्यासाठी सलीमानं हातात बंदुक उचलली.

सरकारमध्ये महिलांचा समावेश करणार – तालिबान

तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर आता तिथे सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तालिबानी सत्तेत महिलांना स्वातंत्र मिळेल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहेत. परंतु शरिया कायद्याप्रमाणेच देश चालेल. इतकचं नाही तर तालिबानने महिलांचा सरकारमध्ये समावेश असेल असंही म्हटलं आहे. परंतु हे आश्वासन देऊन २४ तास उलटत नाही तोवर तालिबानने सलीमा मजीराला अटक केली आहे.

जगभरातील देशांनी निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या - मलाला

तालिबानने अफगाणिस्तानला कब्जात घेतले आणि आम्ही हे सुन्नपणे पाहत आहोत. महिला, अल्पसंख्याक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची काळजी वाटते.  जागतिक आणि विभागीय व स्थानिक शक्तींनी तत्काळ शस्त्रसंधी करून, तत्काळ मानवतावादी मदत द्यावी, तसेच निर्वासित आणि नागरिकांचे रक्षण करावे. त्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफजई  अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक यांच्याबाबत चिंतेत आहेत. जागतिक नेत्यांना तत्काळ शस्त्रसंधी करण्याचे तसेच निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या, असे आवाहन मलाला यांनी केले.

Web Title: Taliban: Salima Mazari, who took up arms to fight Taliban in Balkh Province,captured in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.