Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:26 PM2021-09-01T20:26:08+5:302021-09-01T20:26:42+5:30

Afghanistan Crisis: तालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज.

Taliban say talks with leaders of Panjshir went in vain call for peace afghanistan crisis | Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन

Afghanistan Crisis : पंजशीरमध्ये तालिबानींना जशासतसं उत्तर; तालिबानकडून शांततेचं आवाहन

Next
ठळक मुद्देतालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज

अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला अद्याप पंजशीरवर कब्जा करता आलेला नाही. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे दावे करणारा तालिबान पंजशीरवर हल्ले करत आहे. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. पंजशीर प्रांतात घुसखोरीचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत. तालिबाननं मंगळवारी रात्रीदेखील पंजशीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले. पंजशीरचं संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सनं याबद्दलची माहिती दिली आहे. 

तालिबाननं घुसखोरीचे प्रयत्न केले असले तरी त्यांना कडव्या झुंजीचा सामना करावा लागला. यानंतर मात्र तालिबाननं शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच पंजशीरच्या नागरिकांना इस्लामिक राजवटीबाबात सांगत समर्थन करण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानातील आघाडीच्या टीव्ही चॅनेल टोलो न्यूजने वृत्त दिलं आहे की तालिबान नेता आमीर खान मुताकी याने पंजीरमधील लोकांना इस्लामिक अमीरातमध्ये सामील होण्यासाठी विनंती करणारा एक रकॉर्डेड संदेश पाठवला आहे. 'पंजशीर समस्या' सोडवण्यासाठी बोलणी झाली आहेत, परंतु आतापर्यंत कोणताही परिणाम समोर आलेला नाही, असंही त्यानं सांगितलं. काही लोकांना पंजशीरमध्ये लढायचं आहे. त्यांनी शांततेत तोडगा काढण्यासाठी पंजशीरच्या लोकांना त्यानं समजावण्यास सांगितलं. बंदुकीच्या बळावर देश ताब्यात घेणाऱ्या संघटनेच्या नेत्याने तालिबानला अजूनही हा मुद्दा शांततेनं सोडवायचा असल्याचं सांगितलं.

एकीकडे लढाई, दुसरीकडे शांततेचं आवाहन
मंगळवारी रात्री हल्ला करणाऱ्या जवळपास ३५० तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून ४० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कैद केल्याची माहिती नॉर्दर्न अलायन्सनं दिली आहे. ही कारवाई करताना नॉदर्न अलायन्सच्या हाती अमेरिकन वाहनं आणि हत्यारं लागली आहेत. सोमवारी रात्रीदेखील तालिबानी दहशतवाद्यांनी पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही नॉर्दर्न अलायन्सनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

अहमद मसूदना ठार करण्याचा हेतू
ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानचे राजदूत मुहम्मद जोहिर अगबर यांनी म्हटले आहे की तालिबान गट पंजशीरमध्ये प्रतिरोध आघाडीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार नाही आणि त्यांचा नेता अहमद मसूदला ठार मारण्याचा त्यांचा हेतू आहे. "तालिबान त्यांच्याशी (पंजशीरमधील प्रतिकारांचा नेता) कधीही चर्चा करणार नाही. ते राजकारणी नसून दहशतवादी आहेत. ते कठोर आणि आक्रमक आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानला गुडघ्यावर आणण हे त्याचे ध्येय आहे. दोहा चर्चेतील कोणत्याही अटी ते मान्य करत नाहीत. त्यांचे ध्येय प्रतिकार करणाऱ्या नेत्यांना, विशेषत: अहमद मसूदना संपवणं आहे," असंही ते म्हणाले. 

Web Title: Taliban say talks with leaders of Panjshir went in vain call for peace afghanistan crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.