अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 06:59 PM2021-08-29T18:59:29+5:302021-08-29T19:01:38+5:30
तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. (Taliban in Afghanistan)
अफगाणिस्तानवरतालिबानने ताबा मिळवून 15 दिवस होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी, तालिबानीदहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला. यानंतर संपूर्ण देशात तालिबानचे राज्य सुरू झाले. तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. खरे तर, तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांना अनेक प्रकारची सूट देण्याची घोषणा केली होती. पण आता त्यांनी निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. तालिबानने विद्यापीठात मिला-मुलींच्या एकत्रित शिकण्यावर बंदी घातली आहे. (Taliban says boys and girls will no longer study together in afghanistan university)
अफगाणिस्तानच्या कार्यवाहक शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे, की मुले आणि मुलींना विद्यापीठांतून एकत्रपणे शिक्षण घेता येणार नाही. तसेच इस्लामिक कायद्या प्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे शिकावे लागेल, असे ट्विट अफगाणिस्तानातील एक पत्रकार झियार खान याद यांनी केले आहे.
Acting Taliban Minister of Higher Education:
— Ziar Khan Yaad (@ziaryaad) August 29, 2021
Girls and boys will no longer be able to study together in universities and will continue to study in separate classes in accordance with Islamic law.
अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!
यापूर्वी, नुकतेच तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातही असाच आदेश जारी केला होता. यात, शासकीय आणि खाजगी विद्यापीठांत मुले आणि मुली एकाच वर्गात एकत्र बसून शिकू शकणार नाहीत, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर यासंदर्भात विद्यापीठांचे प्राध्यापक आणि महाविद्यालयांच्या मालकांसोबत बैठकही घेण्यात आली होती.
नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी -
"अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तालिबानमध्ये कमांड देण्याच्या बाबतीत ऐक्याचा अभाव आहे," कसे काबूलमधील एका माजी सरकारी सूत्राने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया
"अफगाणिस्तानात सत्तेवरून प्रचंड वाद सुरू आहेत. विविध जाती आणि जमातींना सत्ता हवी आहे. तालिबानसाठी हा मोठा धक्का आहे," असे सूत्राने सांगितले. हक्कानी नेटवर्ककडे आधीच काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी (प्रभारी म्हणून) देण्यात आली आहे. ते अफगाणिस्तानशी संबंधित राजकीय आणि लष्करीदृष्ट्या पडद्यामागील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या आणि 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यालाच अफगाणिस्तानमधील सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.