Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:11 PM2021-08-19T16:11:21+5:302021-08-19T16:12:18+5:30

Afghanistan Crisis: तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

Taliban search for people they believe worked with US and NATO forces in Kabul Airport | Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

Next

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबाननं कब्जा केल्यानंतर देशात आता परदेशी देशांना मदत करणाऱ्या स्थानिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. तालिबान्यांना हद्दपार करण्यासाठी अमेरिकन सैन्याची मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यास तालिबान्यांनी सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्याच्या साथीनं तालिबानमध्ये २० वर्षांपूर्वी सत्तापालट करण्यात आला होता. तालिबान्यांना सत्तेतून बेदखल करून अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापन करण्यात आलं होतं. तालिबान्यांनाविरोधात कारवाई करताना स्थानिक नागरिकांची खूप मोठी मदत अमेरिकन सैन्याला झाली होती. यात ट्रान्सलेटर आणि गुप्त सूचना देणाऱ्यांचा मोठा सहभाग होता. ( Taliban search for people they believe worked with US and NATO forces in Kabul Airport)

'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात तालिबानकडून अमेरिका आणि नाटो सुरक्षा दलासोबत काम केलेल्या स्थानिक नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचा नमूद करण्यात आलं आहे. काबुल विमानतळावरील गर्दीत या नागरिकांचा शोध घेतला जात आहे आणि ते न सापडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या तालिबान्यांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे तालिबानचे इरादे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. 

यापुढे अफगाणिस्तानात... तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार?

माफी दिल्याचं जाहीर केल्यानंतरही तालिबानकडून झाडाझडती
तालिबानी नेत्यांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करून आजवर झालेल्या चुकांबाबत सर्वांना माफ केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. "आम्ही सर्वांना माफ केलं असून आता आमची कुणाही सोबत शत्रुत्व नाही. अफगाणिस्तानात उत्तम सरकार आम्ही देण्याची तयारी करत आहोत", असं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पण दुसरीकडे तालिबान्यांकडून घरोघरी झाडाझडती घेतली जात असून परदेशी सैन्यांना मदत करणाऱ्यांचा शोध तालिबानकडून घेतला जात आहे. 

Web Title: Taliban search for people they believe worked with US and NATO forces in Kabul Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.