पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:48 PM2021-08-26T22:48:33+5:302021-08-26T22:53:24+5:30

दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच झोंबले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन ...

Taliban Shahabuddin Delawar reaction on pm Narendra Modi empire of terror comment | पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

Next

दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच झोंबले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन दिलावरने मोदींचे हे वक्तव्य आव्हान म्हणून स्वीकारत, त्याची संघटना यशस्वी होईल, असा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिलावर म्हणाला, की तालिबान चांगल्या प्रकारे देश चालवू शकतो, हे भारताला लवकरच दिसेल. मोदींनी सोमनाथ मंदिराशी संबंधित अनेक विकास कामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमादरम्यान तालिबानचा उल्लेख न करता हे वक्तव्य केले होते. (Taliban Shahabuddin Delawar reaction on pm Narendra Modi empire of terror comment)

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, 'भगवान सोमनाथांचे मंदिर आज केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विश्वासाचे केंद्र आहे. ज्या विध्वंसक शक्ती आहेत... दहशतीच्या बळावर सामर्थ्य निर्माण करणारा जो विचार आहे... तो एखाद्या कालखंडात भलेही बरचढ ठरो, मात्र, त्याचे अस्तित्व फार काळ नसते. तो फार काळ मानवतेला दाबू शकत नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याकडे अफगाणिस्तानातील परिस्थितीला जोडून पाहिले गेले.

Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन दिलावरने 'रेडियो पाकिस्तान'ला दिलेल्या एका मुलाखतीत, अफगानिस्तानच्या अतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नका, असा इशाराही भारताला दिला आहे. याच बरोबर, त्याने पाकिस्तानला मित्र राष्ट्र म्हणत, 30 लाखहून अधिक अफगाण नागरिकांना शरण दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. याशिवाय सर्वच देशांसोबत शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, अशी तालिबानची इच्छा असल्याचेही त्याने म्हटले आहे.

Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोनबॉम्ब स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट -
अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्ब स्फोट झाले आहेत. अमेरिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटांत आतापर्यंत 15 जणांच्या मृत्यूची झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Taliban Shahabuddin Delawar reaction on pm Narendra Modi empire of terror comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.