Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:05 PM2021-08-19T16:05:37+5:302021-08-19T16:06:39+5:30

Taliban special forces in Kabul: तालिबानी आजवर सलवार, कमीजमध्येच दिसून आले आहेत. परंतू बद्री 313 च्या कमांडोंनी काबुल आपल्या ताब्यात घेतले आहे. तालिबानी दहशतवादी आता या कमांडोंच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत.

Taliban special forces in Afghanistan? Badri 313' unit is securing Kabul for Taliban | Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

Next

Taliban Commando Badri 313: काबुलच्या (Kabul) रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अत्याधुनिक रायफली हातात घेऊन गणवेशधारी कमांडो फिरत आहेत. हे सैनिक अमेरिकेचे की तालिबानचे (Taliban) तेच लोकांना कळेनासे झाले आहे. एकीकडे काबुलमधील चकाचक वातावरण पाहून तालिबानी हैराण असताना, दुसरीकडे तालिबानी दहशतवाद्यांचे हे रुप पाहून जग हैराण झाले आहे. तालिबानने हायटेक कमांडो (Commando) बटालियन बद्री 313 ची स्थापना केली आहे. (Heavily armed fighters with American equipment and commando-style bullet proof vests and 'night vision goggles')

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

तालिबानी आजवर सलवार, कमीजमध्येच दिसून आले आहेत. परंतू बद्री 313 च्या कमांडोंनी काबुल आपल्या ताब्यात घेतले आहे. तालिबानी दहशतवादी आता या कमांडोंच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. हे कमांडो प्रशिक्षित असून अमेरिकी शस्त्रांनी युक्त आहेत. अमेरिकी M-4 रायफल, बॉडी आर्मर, नाइट व्हिजन डिव्हाइस, बुलेट प्रूफ जॅकेट आणि त्यांच्याकजे हम्वी एसयुव्ही आहेत. तज्ज्ञांनुसार हे कमांडो काही खास उद्देशाने काबुलमध्ये तैनात करण्यात आले आहेत. 

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

ही शस्त्रे त्यांनी अफगानच्या सैन्याकडून मिळविली आहेत, असे म्हटले जात आहे. कमांडोंकडे M-4 आणि तालिबानी दहशतवाद्यांकडे एके-47 आहे. तालिबानी जिथे फेटे बांधून आहेत, तिथे हे कमांडो हेल्मेट, धुळ, उन्हापासून संरक्षणासाठी काळा गॉगल घालून फिरत आहेत. युद्धावेळी वापरण्यात येणारे बुट घातलेले आहेत. 

Afghanistan Crisis: भयावह! तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाची शस्त्रास्त्रे; संख्या काही देशांएवढी

अफगान मीडियानुसार हे कमांडो काबुलमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तैनात आहेत. तालिबानचा स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष मुल्ला बरादर आणि अन्य नेते काबुलमध्येच राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी बद्री बटालियनला सोपविण्यात आली आहे. या कमांडोंना शहरी भागातील युद्धाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या युनिटचे नाव बद्रच्या लढाईवरून ठेवण्यात आले आहे. कुरानात या युद्धाचा उल्लेख आहे. पैगंबरांनी 1400 वर्षांपूर्वी केवळ 313 योध्द्धयांच्या साथीने शत्रूला हरविले होते. या कमांडोंना पाकिस्तानकडून प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

सोमवारपासून अफगानिस्तानचा चेहराच बदलला आहे. तालिबानी रस्त्यावर फिरू लागले असून त्यांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. झेंड्यावरून प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर तालिबानींनी गोळीबार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे मिशन पूर्ण होताच शस्त्रांनी भरलेले ट्रकचे ट्रक पाकिसातानात पाठविण्यात आले आहेत. ही शस्त्रे तालिबानींसाठी पाकिस्तानने पुरविली होती. परंतू, या मागे आणखी एक कारण समोर आले आहे. 
तालिबान दहशतवाद्यांच्या हाती अमेरिका, रशिया आणि युएनने अफगानिस्तान सैन्याला दिलेली शस्त्रे लागली आहेत. या शस्त्रास्त्रांची किंमत अब्जावधी डॉलर असून ही न मोजता येणारी शस्त्रे पाहता अनेक देशांच्या बरोबरीने तालिबानची ताकद तयार झाली आहे. ही ताकद रातोरात मिळाल्याने तालिबान प्रबळ झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे तालिबानकडे आता अफगान सैन्यातील प्रशिक्षित जवान, पायलट देखील आहेत. जिवाच्या भितीने ते देखील तालिबानला सामिल झाले आहेत.

Web Title: Taliban special forces in Afghanistan? Badri 313' unit is securing Kabul for Taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.