युद्ध पेटलं! पाकिस्तानच्या अनेक गावांवर तालिबानचा कब्जा; अफगाणिस्तान बॉर्डर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:31 PM2023-09-07T12:31:53+5:302023-09-07T12:33:00+5:30
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे.
नवी दिल्ली – ज्या तालिबानलापाकिस्ताननं मोठं केले, आता तोच तालिबानपाकिस्तानच्या गळ्याभोवती फास आवळून बसला आहे. तहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजे TTP ने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले आहे. अफगाणिस्तानच्यी सीमेलगत तोरखम बॉर्डर टर्मिनलवर पाकिस्तानी सैन्य आणि TTP यांच्यात भीषण गोळीबारी सुरू आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या ४ सैन्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पाक सैनिकांना बंदीस्त केल्याचे समोर आले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने तोरखम बॉर्डरवरील वाहतूक सील केली आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. तहरीक-ए-तालिबान म्हणजे TTP चे कमांडरने अफगाणिस्तान मीडियाला सांगितले की, आम्ही पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला आहे. सध्या त्याठिकाणी इंटरनेट नेटवर्क खराब आहे. इंटरनेट आल्यानंतर कब्जा केलेल्या गावांचे फोटो, व्हिडिओ समोर आणले जातील.
अफगाणिस्तान आणि पाकिस्ताच्या वेगवेगळ्या मीडियाच्या रिपोर्टसचा दावा आहे की, डूरंड लाईनवर पाकिस्तान आणि TTP यांच्या सैन्यात भीषण गोळीबार झाला आहे. संघर्षामुळे तोरखम बॉर्डर सील करण्यात आली आहे. परंतु गावांवर कब्जा केल्याचा पाकिस्तानकडून फेटाळले आहे. TTP सैन्यानी पाकिस्तानच्या कुठल्याही गावांवर कब्जा केला नाही असं पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर TTP प्रवक्ता मुहम्मद खुरासानी यांनी निवेदन जारी करत बॉर्डर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. आमची लढाई पाकिस्तानी सरकार आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणांशी आहे. आम्ही सामान्य नागरिकांना कुठलेही नुकसान करणार नाही असं त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०२२ मध्ये TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात युद्ध पुकारले. TTP चं म्हणणं आहे की, आम्ही पाकिस्तानी सैन्याला हरवून तिथल्या सरकारची सत्ता उखडून टाकू. मग त्याठिकाणी तहरीक ए तालिबान शरिया कायद्याचं पालन करणारे सरकार बनवेल. या मिशनला पूर्ण करण्यासाठी TTP ने मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानात मोठमोठे हल्ले केले आहेत. TTP ला अलकायदाचे निकटवर्तीय मानले जाते. २ सप्टेंबरला अफगाणिस्तान सीमेनजीक कबायली परिसरात पाक सैन्याने गुप्तचर ऑपरेशन केले. या ऑपरेशनचा हेतून तिथे लपलेले TTP सैनिकांना संपवणे होते. परंतु या चकमकीत पाकिस्तानी सैन्याचे १ मेजर आणि १ सैनिक यांचा मृत्यू झाला. याआधी २ दिवसांपूर्वी पख्तूनख्वामध्ये टीटीपीच्या आत्मघाती हल्ल्यात ९ पाकिस्तानी सैन्याचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचा दावा काय?
पाकिस्तानी हद्दीत TTP ने कुठल्याही प्रकारचा कब्जा केला नाही. परंतु चकमकीत आमच्या ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबूल केले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मीडियाने म्हटलं की, पाकिस्तानच्या ओस्ताई सुरक्षा चौकीवर TTP ने हल्ला केला. ज्यात २ पाकिस्तानी जवान मारले गेले. जंजीरीत इथंही हल्ला झाला त्यात २ सैनिक मृत्यूमुखी पडले. या चकमकीत ४ जवानही जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याच्या प्रत्युत्तरात TTP चे १२ सैनिक ठार झालेत आणि मोठ्या संख्येने अनेकजण जखमी झालेत.