अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:07 PM2021-08-15T17:07:37+5:302021-08-15T17:10:57+5:30

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे.

Taliban terrorist enter Afghanistan capital kabul hold all border crossings | अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

Next

काबूल - अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांसदर्भात एक ताजी आणि चिंताजनक बातमी आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनीअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाय ठेवला असल्याचे समजते. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तीन अधिकाऱ्यांनीही तालिबानी दहशतवादी काबुलच्या सीमेत घुसल्याची पुष्टी  केली आहे. यापूर्वी तालिबानने सर्व बॉर्डर क्रासिंगवर ताबा मिळवला आहे.

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. टोलो न्यूजनुसार, अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, 'काबूलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तन शांततेत होईल.' एवढेच नाही, तर काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलांची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

AP या वृत्तसंस्थेनुसार, तालिबानकडून वाटाघाटी करणारे काही लोक अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. ते तेथे सत्ता हस्तांतरणासंदर्भात चर्चा करतील.

तत्पूर्वी, तालिबानने निवेदन जारी केले होते, की काबुलवर ताकदीच्या जोरावर ताबा मिळविण्याची तालिबानची इच्छा नाही. आम्हाला सर्व काही ट्रांझिशन फेजने हवे आहे. तसेच, सत्ता परिवर्तन सहजतेने झाले, तर कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्त हाणी होणार नाही.

सैनिकांवर कारवाई करणार नाही -
तालिबानी दहशतवादी काबूलमध्ये घुसल्याचे वृत्त येत असतानाच, तालिबाननेही एक निवेदन जारी केले आहे. यात, दहशतवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश करू नये आणि सीमेवर थांबावे, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर आपण नागरिक अथवा अफगाण सैन्यावर बदला घेण्याच्या भावणेतून कसल्याही प्रकारची कारवाई करणार नाही, असे आश्वासन देतो. याच बरोबर सर्वांना घरातच राहण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच कुणीही देश सोडण्याचाही प्रयत्न करू नये, असेही यात म्हणण्यात आले आहे.

Web Title: Taliban terrorist enter Afghanistan capital kabul hold all border crossings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.