महासंकट! तालिबानी दहशतनाद्यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रे लुटली, भारताआधी 'या' दैशात घालू शकतात थैमान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:46 PM2021-08-24T18:46:12+5:302021-08-24T18:48:37+5:30
संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons)
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. यातच, भारतीय उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक धक्कादायक माहिती दिली. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण सैन्याकडून अमेरिकन शस्त्रे लुटली आहेत आणि ती पाकिस्तानात पाठविली आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या शस्त्रांचा वापर करून दहशतवादी भारताआधी पाकिस्तानातच थैमान घालू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, भारतातील सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांनाही ही शस्त्रे पुरविण्याची शक्यता आहे, मात्र, आपले सुरक्षा दर त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असेही अधिकार्यांनी म्हटले आहे. (Taliban terrorist looted American weapons likely to be first used for violence in pakistan before reaching india)
सीआयएच्या संचालकाची तालिबानी नेत्यासोबत काबूलमध्ये गुप्त बैठक
संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. मात्र, तालिबानच्या विजयाने दहशतवादी गटांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे तेथे या शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने गेल्या 20 वर्षांत अफगाण सैन्याला M-16 आणि M-4 असॉल्ट रायफल्ससह 6.5 लाखहून अधिक लहान शस्त्रे पुरवली आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर दारूगोळाही दिला आहे.
अमेरिकन सैन्याने अफगाण सैनिकांना मोठ्या प्रमाणावर बुलेटप्रूफ उपकरणे, नाईट व्हिजन गॉगल्स आदी गोष्टीही दिल्या होत्या. मात्र, तालिबान्यांनी तिही लुटली आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात स्नायपर रायफल्सदेखील दहशतवादी गटाच्या हाती गेल्या आहेत.