Afghanistan Crisis : तालिबान्यांची क्रुरता, मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:39 AM2021-08-23T10:39:14+5:302021-08-23T10:39:39+5:30
Afghanistan Crisis : तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. अफगाणिस्तानमधून भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता सांगितली.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली जात आहेत. यातच तालिबान्यांचा क्रुर चेहरा सर्वांसमोर येत आहे. अफगाणिस्तानमधून भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता सांगितली. त्यांनी म्हटले की तालिबानी दहशतवादी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार (Taliban Had Sex With Dead Bodies) करतात. त्यांच्याकडून माणूसकीची आशा करता येणार नाही. अफगाणिस्तानामधील महिला संकटात आहेत.
तालिबान्यांकडून मृतदेहावरही बलात्कार
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कानने म्हटले की, तालिबानी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात. त्यांना मुलगी जिवंत आहे की, मेलेली आहे, याचा काही फरक पडत नाही. या लोकांवर विश्वास ठेवता येणार नाही. तालिबानी एक तर मुलींच अपहरण करून घेऊन जात असत किंवा गोळी घालून ठार करीत असत. ही तर सुरूवात आहे. ते लोक बऱ्याच क्रुर गोष्टी करतात.
तालिबान्यांचा फक्त एक दिखावा
मु्स्कान यांनी पुढे सांगितले की, तालिबान्यांची इच्छा असते की त्यांना प्रत्येक घरातून मुली मिळाव्यात. ते 10 ते 12 वर्षाच्या मुलींना उचलून घेऊन जातात. तसेच, ते मीडियासमोर खोटं बोलत आहेत की ते बदलले आहेत. तो फक्त एक दिखावा आहे. ते मुलींना औषधं देऊन बेशुद्ध करत होते आणि ताबूतमध्ये ठेवून पाकिस्तानकडे घेऊन जात असत. ज्यावेळी आम्ही त्याठिकाणी होतो, त्यावेळी आम्हाला धमक्या येत होत्या.
तालिबान्यांनी मागितली मुलींची यादी
याआधी तालिबानी दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात असलेल्या परिसरातील मौलवींना आदेश दिली होते की, 12 वर्षाहून अधिक मुलींची यादी त्यांना द्यावी. तालिबान्यांचे म्हणणे होते की, ते त्यांच्याशी लग्न करतील. परंतु सत्य हे आहे की, ते मुलींना गुलाम बनवू इच्छिता आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते मुलींशी संबध ठेवतील.
दरम्यान, अलीकडेच तालिबानी दहशतवाद्यांनी जेवण चविष्ट बनवले नसल्यामुळे एका महिलेला जाळून ठार मारल्याची बातमी आली होती.