भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेल्या Mi-24 हेलिकॉप्टरवर तालिबानचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:18 PM2021-08-12T13:18:54+5:302021-08-12T13:19:54+5:30
अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे.
काबूल: आताच्या घडीला तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने (Taliban) जवळपास 65 टक्के अफगानिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला आहे. यामुळे आता सरकारमध्ये देखील तालिबानची दहशत निर्माण होत चालली आहे. (taliban took control on mi 24 attack helicopter which india gifted to afghan)
भारताने अफगाणिस्तानला भेट दिलेल्या हेलिकॉप्टरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर हल्ला करण्यासाठी वापरू नये, यासाठी पूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याने काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ
भारताने अफगाण हवाई दलाला दिले होते भेट
सन २०१९ मध्ये भारताने अफगाण हवाई दलाला तीन चित्ता हेलिकॉप्टर्ससह Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर भेट दिले होते. Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर २०१५ मध्ये अफगाणिस्तानला भेट देण्यात आलेल्या चार लढाऊ हेलिकॉप्टरच्या बदल्यात देण्यात आले होते. राजधानी काबुल पासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवला आहे.
भन्नाट योजना! पुढील ३ महिन्यांत हायवेवरील टोलनाके बंद होणार?; नितीन गडकरींचा ‘मेगा प्लान’
आठ पायलटांची हत्या
गेल्या काही आठवड्यांत आठ पायलटांची हत्या झाली आहे. यामध्ये ब्लॅक हॉक पायलट हमीदुल्लाह अज़ीमी देखील आहेत. त्यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. काबूलजवळ बॉम्ब फुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अन्य पाच नागरिक जखमी झाले. गेल्या काही दिवसांत १९ पायलटांनी हवाई दलाची नोकरी सोडली आहे. एका पायलटाने सांगितले की, नोकरीवर येताना दररोज वेगवेगळ्या कार, वाहनांमधून जावे लागते. काही मित्र आहेत त्यांच्या कार मागाव्या लागतात. घरातूनही बाजारात जाता येत नाही. केस कापायलाही जाऊ शकत नाही. मी आता नोकरी सोडण्याचा विचार करत आहे.