Taliban War:खुद्द अमेरिका हैराण! एकही युद्ध लढले नाहीत, तरीही जिंकण्याच्या तयारीत तालिबान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:15 PM2021-07-21T21:15:03+5:302021-07-21T21:15:53+5:30
Afghanistan- Taliban War: उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेवर बॉर्डर पोस्ट ताब्यात घेण्यासाठी भयंकर लढाई सुरु आहे. जोवजान आणि बल्ख प्रांतांमध्ये तालिबानला आपला दबदबा वाढवायचा आहे.
काबुल : अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकेने (America) २० वर्षांपासून तळ ठोकून असेलेले सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. कंदाहर सारख्या शहरांना ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवादी राजधानी काबुलच्या दिशेने कुच करू लागले आहेत. यामुळे तिकडे अमेरिका हैरान झाली आहे. एकाही युद्धाचा अनुभव नसताना तालिबान कसे काय एवढी मजल मारू शकते असा प्रश्न पडला आहे. (How Taliban winning in Afghanistan; America in tension)
तालिबानी मोजून दमले! पाकिस्तान सीमेनजीक अफगान सैन्याच्या चौकीवर तीन अब्ज रुपये सापडले
तालिबानने अफगानिस्तानच्या सीमेवरील अनेक पोस्टवर कब्जा केला आहे. नुकतेच तीन अब्ज पाकिस्तानी रुपये सापडल्याचे वृत्त आले होते. जास्त रक्तपात न करता अफगाणिस्तान कसे काय देश जिंकण्याची तयारी करत आहे, असा प्रश्न अमेरिकेच्या बड्या बड्या अधिकाऱ्यांसमोर पडला आहे. ज्या बॉर्डर पोस्टवर तालिबानचा कब्जा आहे तेथील व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे सरकारला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक ठप्प झाल्याने काबुलमध्ये अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
अफगाणिस्तानचे अशरफ गनी सरकार सध्या काहीच पोस्टवर आपला ताबा ठेवून आहेत. इराण, पाकिस्तानच्या सीमेवरून 2.9 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तालिबानच्या ताब्यात यापैकी 0.9 अब्ज डॉलरचा व्यापार होणारी पोस्ट गेली आहेत. उरलेल्या पोस्टवर तालिबान कब्जा करण्यासाठी रणनिती आखत आहे. अमेरिकेला या तालिबानच्या खतरनाक प्लॅनची चिंता वाटू लागली आहे.
भयंकर युद्ध सुरु
उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेवर बॉर्डर पोस्ट ताब्यात घेण्यासाठी भयंकर लढाई सुरु आहे. जोवजान आणि बल्ख प्रांतांमध्ये तालिबानला आपला दबदबा वाढवायचा आहे. अफगाणिस्तान चारही बाजुंनी जमिनीने वेढलेला आहे. तालिबानने काबुलला होणारी मालवाहतूक रोखली आहे. यामुळे काबुलमध्ये मोठा टंचाई होण्याची शक्यता आहे. तालिबानला एवढा मोठा प्लॅन कोणी सुचविला, याच कोड्यात अमेरिका पडली आहे. तालिबान अफगाणिस्तानचे वीजनिर्मिती प्रकल्प, सरकारी यंत्रणा बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहे. एक दिवस आधीच राष्ट्रपतींच्या नमाजावेळी तालिबानने काही रॉकेट डागले आहेत. सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट आदळल्याने लोकांमध्येही आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.