तालिबानचा 'हा' प्रमुख नेता पाकिस्तानी सैन्याच्या कैदेत, गुप्तचर संस्थांनी भारताला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:42 PM2021-08-20T15:42:28+5:302021-08-20T15:44:11+5:30

Afghanistan Crisis: तालिबानच्या प्रमुख नेत्यांपैकी हैबतुल्‍लाह अखुंदजादा मागील सहा महिन्यांपासून कोणालाही दिसला नाही.

Taliban's Haibatullah Akhundzada is being held captive by Pakistani forces, according to intelligence sources | तालिबानचा 'हा' प्रमुख नेता पाकिस्तानी सैन्याच्या कैदेत, गुप्तचर संस्थांनी भारताला दिली माहिती

तालिबानचा 'हा' प्रमुख नेता पाकिस्तानी सैन्याच्या कैदेत, गुप्तचर संस्थांनी भारताला दिली माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली:तालिबाननंअफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. आता लवकरच देशात तालिबानचं सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला आहे की, तालिबानचा मुख्य नेता हैबतुल्लाह अखुंदजादा कुठं आहे? याबाबत परदेशी गुप्तचर संस्थांनी मोठा खुलासा केला आहे. भारत सरकार या संदर्भात परदेशी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीवर बारीक नजर ठेवून आहे.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानच्या हैबतुल्लाह अखुंदजादा याचं नाव मोठं आहे. तालिबनला मोठं करण्यात याचाही मोठा वाटा आहे. पण, अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तो एकदाही समोर आलेला नाही. यामुळे तो कुठं आहे, असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. दरम्यान, एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हैबतुल्लाह अखुंदजादा सध्या पाकिस्तानच्या कोठडीत असू शकतो. मागील सहा महिन्यांपासून तालिबानच्या प्रमुख नेते आणि सैनिकंनी त्याला पाहिलेच नाहीये. आता पाकिस्तान हे प्रकरण कशाप्रकारे हाताळतो, यावर भारताचे लक्ष्य आहे.

2016 मध्ये प्रमुखपदी नियुक्ती 
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी नेता अख्तर मन्सूर ठार झाल्यानंतर हैबतुल्ला अखुंदजादा याची मे 2016 मध्ये तालिबान प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ग्रुपनं शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, मंसूरच्या दोन मुख्य डेप्युटींपैकी हबतुल्लाहला पाकिस्तानमधील बैठकीत बढती देण्यात आली होती.
 

Web Title: Taliban's Haibatullah Akhundzada is being held captive by Pakistani forces, according to intelligence sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.