चिनी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याबाबत चर्चा

By admin | Published: September 10, 2014 06:07 AM2014-09-10T06:07:15+5:302014-09-10T06:07:15+5:30

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळ चीनला आले

Talk about the visit of Chinese President | चिनी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याबाबत चर्चा

चिनी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याबाबत चर्चा

Next

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळ चीनला आले असून, मंगळवारी त्यांनी चीनच्या वरिष्ठ मुत्सद्यांसह राजकीय परिषदेचे सदस्य यांग जेईची यांच्यासोबत चर्चा केली. शी पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, डोभाल यांनी राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी मंगळवारी चर्चा केली.
डोभाल पंतप्रधान मोदी यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून सोमवारी येथे पोहोचले. ते शी यांच्या भारत दौऱ्याच्या तयारीनिमित्त आले आहेत. त्यांनी यांग यांची येथे भेट घेतली. यांग भारत - चीन सीमा चर्चेसाठी चीनचे विशेष प्रतिनिधी आहेत. डोभाल यांचे स्वागत करताना ते म्हणाले की, आपण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चीन दौऱ्याला खूप महत्त्व देतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Talk about the visit of Chinese President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.