टांझानिया: 'टाइट पॅन्ट' परिधान करणं ठरला गुन्हा; महिला खासदाराला भर संसदेतून बाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 04:44 PM2021-06-06T16:44:30+5:302021-06-06T16:47:40+5:30

संसदेत समाजाची विचारसरणी आणि त्याची झलक दिसत असते, असा हुसैन अमर यांचा तर्क होता. याच वेळी  त्यांनी महिलांनी संसदेत टाइट कपडे परिधान करून का येऊ नये, हेही संसदेच्या नियमांचा हवाला देत सांगितले.

In tanzania Female mp asked to leave parliament for wearing tight pants | टांझानिया: 'टाइट पॅन्ट' परिधान करणं ठरला गुन्हा; महिला खासदाराला भर संसदेतून बाहेर काढलं

टांझानिया: 'टाइट पॅन्ट' परिधान करणं ठरला गुन्हा; महिला खासदाराला भर संसदेतून बाहेर काढलं

Next

कुणी कसे कपडे परिधान करावेत, हा अधिकार ज्याला त्याला असायला हवा. मात्र, महिलांसाठी आपल्या कपड्यांवर निर्णय घेणे एवढे सोपे नाही. मग ती महिला कुठल्याही मोठ्या पदावर का असेना. अशीच एक घटना टांझानियात (tanzania) घडली आहे. येथे एका महिला खासदाराला केवळ टाईट पॅन्ट परिधान केली, म्हणून भर संसदेतून बाहेर काढण्यात आले. (In tanzania Female mp asked to leave parliament for wearing tight pants)

टांझानियातील महिला खासदार कॉनडेस्टर शिजवेल (Condester Sichwale) यांना संसद अध्यक्षांनी बाहेर काढले. यावेळी, 'जा आधी व्यवस्थित कपडे परिधान करा आणि मग संसदेत या,' असे संसद अध्यक्ष जॉब डुगाई या, संबंधित महिला खासदाराला उद्देशून म्हणाल्या.' एक पुरुष खासदार हुसैन अमर कॉनडेस्टर यांच्या कपड्यांकडे पाहून, 'आपल्या काही बहिणींनी अजबच कपडे परिधान केले आहेत. त्या समाजाला काय दाखवत आहेत?', असे म्हणाले. यानंतर हे संपूर्ण प्रकरण घडले.

 “पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन

संसदेत समाजाची विचारसरणी आणि त्याची झलक दिसत असते, असा हुसैन अमर यांचा तर्क होता. याच वेळी  त्यांनी महिलांनी संसदेत टाइट कपडे परिधान करून का येऊ नये, हेही संसदेच्या नियमांचा हवाला देत सांगितले.

कॉनडेस्टर यांच्या कपड्यांवर आक्षेप घेत, त्यांना संसदेतून बाहेर काढण्यात आल्याने इतर महिला खासदारांत नाराजी आहे. कॉनडेस्टर यांना अशा प्रकारे संसदेतून बाहेर काढल्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणीही या महिला खासदारांनी केली आहे. तसेच, महिला खासदाराला बाहेर काढल्यानंतर संसद अध्यक्ष म्हणाल्या, महिला खासदाराच्या कपड्यांसंदर्भात पहिल्यांदाच तक्रार आली, असे नाही.  याच वेळी त्यांनी, कुणी व्यवस्थित कपडे परिधान केलेले नसतील, तर त्यांना संसदेत प्रवेश देऊ नये, असा आदेशही  संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Web Title: In tanzania Female mp asked to leave parliament for wearing tight pants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.